शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या फेऱ्या रद्द केल्याबाबत उत्तर द्या!

By admin | Updated: March 26, 2017 03:15 IST

वसई-विरार व नालासोपाराच्या हद्दीतून एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या, तर विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई: वसई-विरार व नालासोपाराच्या हद्दीतून एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या, तर विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने २९ मार्चपर्यंत एसटी व वसई-विरार महापालिकेला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.१ एप्रिलपासून वसई-विरार व नालासोपारामध्ये एसटीची सेवा रद्द करण्यात येणार असल्याने, शॅरियन डाबरे या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याने व त्याच्या एका शिक्षिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर होती.शॅरियन भुईगावात राहातो. त्याचे घर ते शाळा पायी सुमारे दीड तासाचे अंतर आहे. या भागात एसटीची बस सकाळी साडेसहा वाजता येते. ही बस पकडून शॅरियन व अन्य विद्यार्थी भुईगावापासून सहा कि.मी. दूर असलेल्या सेंट अ‍ॅन्थनी कॉन्वेंट शाळेत सकाळी ७:१० वाजता पोहोचतात. एप्रिल महिन्यात एसटीची सेवा रद्द झाल्यास, या विद्यार्थ्यांना एवढ्या सकाळी शाळेत जाण्यासाठी अन्य कोणतीच सुविधा नाही. सप्टेंबरमध्ये एसटीने वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहितीही महापालिकेला दिली, तसेच त्यांना महापालिकेची बससेवा सुरू करण्यास सांगितले. मात्र, वसई-विरार महापालिकेने याबाबत अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने २९ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)मुलांना त्रास नकोपरीक्षा जवळ आल्यामुळे एसटीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे खंडपीठाने म्हटले. वसई-विरार व नालासोपारा या ठिकाणी एकूण ८० मार्ग आहेत. त्यापैकी ५२ मार्गावरून वसई-विरार महापालिकेच्या बसेस धावतात. मात्र, २८ मार्गांना एसटी सेवा पुरविते. मात्र, आता एसटीही तोट्यात असल्याने, १ एप्रिलपासून या २८ मार्गांवरून फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे.