शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नशामुक्तीचा ‘आयना’

By admin | Updated: August 15, 2014 01:37 IST

नशामुक्तीचे अभियान राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी काम करणाऱ्या ४० संस्थांनी एकत्रित येत आॅल इंडिया नशामुक्ती अभियान (आयना)ची स्थापना केली आहे

मुंबई : नशामुक्तीचे अभियान राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी काम करणाऱ्या ४० संस्थांनी एकत्रित येत आॅल इंडिया नशामुक्ती अभियान (आयना)ची स्थापना केली आहे. त्यात राज्य शासनाचे नशाबंदी मंडळ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि अन्य महत्त्वाच्या संस्था आणि संघटनांचा समावेश आहे.कृपा फाउंडेशनचे अध्यक्ष फादर जोजप एच. परेरा यांनी या अभियानाचे उद्घाटन करताना राष्ट्रीय स्तरावर हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण योगदान देण्याचे आश्वासन दिले. शिवाय अभियानाला आपला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, नशामुक्ती करीत असताना त्याचा पुरवठाही बंद करणे आवश्यक आहे. कारण नशाबंदी आणि पुरवठा बंदी या दोन गोष्टींचा ताळमेळ साधल्यास राज्य आणि देश नशामुक्त होण्यास मदत होईल. आज तरुण पिढी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांशिवाय जुगार, पोर्नोग्राफी, इंटरनेट, सेक्स अशा विविध व्यसनांच्या अधीन होत आहे. या व्यसनांपासून त्यांची मुक्तता करण्यासाठी विविध संस्थाही काम करीत आहेत. मात्र वेगवेगळ््या पातळ्यांवर काम केल्याने त्यांचा म्हणावा तितका परिणाम होत नाही. ‘आयना’च्या निमित्ताने विविध स्तरांवर समुपदेशन, नशामुक्ती, पुनर्वसन अशी कामे करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत. त्यामुळे व्यसनांविरोधातील ही मोहीम अधिक परिणामकारक ठरेल, असे मत परेरा यांनी व्यक्त केले. गेट वे आॅफ इंडिया परिसरात नो स्मोकिंगचे फलक लावून या अभियानाची सुरुवात करणार असल्याचे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, गेट वे आॅफ इंडियाचा परिसर नो स्मोकिंग झोन असतानाही पालिकेने तशी सूचना देणारा एकही फलक या ठिकाणी लावलेला नाही. त्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी फलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)