शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

आगरीसेना आज राष्ट्रीय महामार्ग रोखणार, मागण्यांसाठी भूमिपुत्र आंदोलनात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:34 IST

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही.

वसई  - भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. विकासात भूमीपूत्रांना स्थान दिले जात नाही. अशा अनेक मागण्या घेऊन शुक्रवारी पालघर जिल्हा आगरी सेना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करणार आहे.आगरी सेना नेते कैलास पाटील, आगरी सेना वसई अध्यक्ष भूपेश कडूलकर तसेच पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतित शिरसाड नाका, राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ वर सकाळी १० वाजता चक्का जाम करण्यात येणार आहे. या महामार्ग रोको आंदोलनास शिवसेनेनेही जाहिर पाठींबा दर्शवला असून, कांग्रेस, मनसे, रिपाईसह इतर पक्षदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. त्यावेळी मोठे मन करून त्यांनी विकासाला जागा दिलेल्या आहेत. परंतु, आता पुन्हा मोठ्या प्रकल्पांसाठी भूमीपुत्रांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. मात्र, त्यांना कवडीमोल भावाने मोबदला दिला जातो. त्यांना रोजगार दिला जात नाही. मच्छीमारांना नुकसान भरपाई, वाढीव घरपट्टी, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, वाढीव विजबिले आणि प्रश्न, म्हाडाचा रखडलेला गृहप्रकल्प, डबघाईस आलेला रेती व्यवसाय, पालिका क्षेत्रातील बांधकाम नियमांकडे दुर्लक्ष, माहितीच्या अधिकाराची पायमल्ली, नारंगी जवळचा नियोजीत उड्डाणपूल, महामार्गानजीक नवीन पोलीस चौकी बनवणे आदि मागण्या आहेत.या रास्ता रोकोला पन्नास हजाराहून अधिक भूमिपूत्र एकवटून महामार्ग रोखणार असल्याचे आगरी सेनेकडून सांगण्यात आले.या आंदोलनास शिवसेनेचे समर्थन पत्र आगरी सेना नेते कैलाश पाटिल व जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटिल (मामा) यांना पालघर उपजिल्हा प्रमुख निलेश तेडोंलकर, दिलिप पिंपळे, तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी दिले.स्थानिक भूमिपूत्रांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी, मागण्यांसाठी आगरी सेनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे. शिवसेना, कॉग्रेस, मनसे, रिपाई पक्षदेखील आमच्यासोबत आहेत.-जनार्दन (मामा) पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा आगरी सेना

टॅग्स :palgharपालघर