शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भत्ता घेऊनही गावी न राहणाऱ्यांवर कारवाई -चौधरी

By admin | Updated: February 18, 2017 06:26 IST

नियुक्तीच्या गावी न राहता अन्यत्र राहून कागदोपत्री निवास दाखवून भत्ता लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार

रविंद्र साळवे / मोखाडानियुक्तीच्या गावी न राहता अन्यत्र राहून कागदोपत्री निवास दाखवून भत्ता लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे. कामाच्या ठिकाणी न रहाणाऱ्या २०० ग्रामसेवकांचा घरभाडे भत्ता बंद करून त्यांची संभाव्य बढती कायमस्वरुपी ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रद्द केली होती. अशी कठोर कारवाई पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणार कधी? पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड या तालुक्यातील ग्रामसेवक, सा.बांधकामचे अधिकारी, शिक्षक असे सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत जव्हार मोखाड्यातले काही मोजके कर्मचारी वगळता बाकीचे नाशिक वा अन्य शहरात राहून आलिशान गाड्यांनी ये-जा करतात येताना उशीरा येणे व जाताना लवकर जाणे ही बाब नित्याचीच झाली आहे व त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. कामाच्या ठिकाणी रहात असल्याची बोगस माहिती देऊन दुर्गम भागात काम करण्यासाठी मिळणारा विशेष भत्ता लाटणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून वठणीवर आणावे अशी मागणी येथील जनतेकडून होते आहे.कर्मचारी व ग्रामसेवक यांनी नियुक्तीच्या ठिकाणी रहायला हवे, व्यवस्था व्हायला हवी. तसेच जे कर्मचारी, ग्रामसेवक यात व आपल्या कामात कसूर करत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.- निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर जिल्हा