शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांच्या मळ्यांवर केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:26 IST

भार्इंदर पोलिसांचा पुढाकार । पिकवण्यासाठी करत होते सांडपाण्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सांडपाण्यावर पालेभाज्या पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालवला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. भार्इंदर पोलिसांनी पश्चिमेतील खाजगी जागेवरील सांडपाण्यावरच्या पालेभाज्यांच्या मळ्यांवर शुक्रवारपासून कारवाई सुरू केली आहे.रेल्वेरुळांजवळ तसेच भार्इंदर पूर्वेच्या नवघर येथील सरकारी जागेत व भार्इंदर पश्चिमेस माहेश्वरी भवनकडून मीरा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीजवळ तसेच राधास्वामी सत्संगमागील खाजगी जागेत मळे तयार करून पालेभाज्या पिकवल्या जातात. सांडपाण्यावर उघडपणे पालेभाज्या पिकवल्या जातात. या भाज्यांची विक्री सहज केली जात असून अशा भाज्या खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मात्र धोका वाढत आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन आदी संबंधितांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयाने आपल्या अखत्यारित ही बाब येत नसल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी मात्र या गंभीरप्रकरणी कारवाईसाठी पुढाकार घेतला.अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी या प्रकरणाची जातीने माहिती घेतली. सांडपाण्यावर पिकवल्या जाणाºया पालेभाज्यांच्या मळ्यांचे ठिकाण मागून घेतले. रेल्वेच्या हद्दीतील सांडपाण्यावरील मळे सोडून पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अशा भाज्यांच्या मळ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घेतला. पाटील यांच्या आदेशानंतर भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी कारवाईची जबाबदारी मुंडे, उथळे, सानप, ठाकूर यांच्या पथकावर सोपवली.पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील खाजगी जागेत असलेल्या या सांडपाण्याच्या भाजीमळ्यांवर कारवाईसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ व जेसीबीची मागणी केली. तीन दिवस पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर शुक्रवारी पालिकेने काही कर्मचारी दिले. पोलीस पथकाने त्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी भाज्या नष्ट करण्यासाठी काठी, खोरे आदींचा वापर केला. तेथून सांडपाणी खेचण्यासाठी लावलेला एक पंप व पाइप जप्त केले. जवळच्या तबेल्यातील गुरांना या मळ्यांमध्ये सोडण्यात आले. परंतु, सांडपाण्यावरील हे भाज्यांचे मळे मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांनी पालिकेकडे जेसीबीची मागणी केली.रेल्वेच्या हद्दीतील मळ्यांवर कारवाई केव्हा?शनिवारी जेसीबी मिळाल्यानंतर त्या जेसीबीच्या मदतीने भाज्या व मळे नष्ट केले. अजूनही काही प्रमाणात मळे शिल्लक असून तेही नष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांडपाण्यावर पिकवणाºया पालेभाज्यांच्या मळ्यांवर कारवाई सुरू केली असली, तरी रेल्वेच्या हद्दीतील मळे व नवघर येथील मळ्यांवर अजून कारवाई झालेली नाही.