शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बिबटयाने केल्या ९ शेळ्या फस्त

By admin | Updated: December 23, 2015 00:28 IST

पिंपरोली या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नऊ बकऱ्यांचा आतापर्यंत फडशा पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याऐवजी वनखात्याने ग्रामस्थांना रात्री फटाके वाजविण्याचा सल्ला दिला आहे.

वसंत भोईर,  वाडापिंपरोली या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नऊ बकऱ्यांचा आतापर्यंत फडशा पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याऐवजी वनखात्याने ग्रामस्थांना रात्री फटाके वाजविण्याचा सल्ला दिला आहे. बिबट्यांची एक मादी आपल्या दोन बछड्यांसह संचार करीत असून रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी नऊ लहान बकऱ्यांचा त्यांनी फडशा पाडला असून २ बकऱ्यांना घेऊन बिबट्या जंगलात पसार झाला आहे. यातील ८ बकऱ्या या पांडुरंग गवारी यांच्या तर एक बकरी विठ्ठल कुऱ्हाडे यांच्या मालकीची होती. या घटनेची पशुवैद्यकीय अधिकारी सोनाळे व वनविभाग वैतरणा यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच हा भाग तानसा अभयारण्यात येत असून या भागात गेल्या अनेक दिवसापासून दोन पिल्लांसह बिबट्याचा मादीचा संचार सुरू असल्याच्या खूणा वनविभाग कर्मचाऱ्यांना दिसून आल्या आहेत. या आधीही तीन बकऱ्यांना अशाच प्रकारे फस्त केल्याचे ग्रामस्थ विठ्ठल कुऱ्हाडे यांनी सांगितले. अगदी लोकवस्तीत बिबटयाचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या मादिसह बछड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या मादीसह बछड्यांचा संचार हा एकाच जागी नसल्याने तिचा बंदोबस्त कसा करायचा असा यक्षप्रश्न वनविभागा पुढे पडला आहे. नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, रात्री एका माणसाने बाहेर पडू नये व रात्री गावात फटाके वाजवावीत असा सतर्कतेच्या सूचना वन विभागाने ग्रामस्थांना दिल्या असल्याची माहिती मोज वनविभागाचे वनपाल पी. आर. कांबळे यांनी दिली आहे.