शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

घोलवड रेल्वे उड्डाण पूलासाठी ४९ कोटी

By admin | Updated: May 6, 2016 01:12 IST

घोलवड रेल्वे स्थानक कात टाकत असून अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रयत्न्नांमुळे घोलवड रेल्वे उड्डाणपूलाकरीता

- अनिरु द्ध पाटील, डहाणू/बोर्डीघोलवड रेल्वे स्थानक कात टाकत असून अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आमदार आनंद ठाकूर यांच्या प्रयत्न्नांमुळे घोलवड रेल्वे उड्डाणपूलाकरीता ४९ कोटी रु पये राज्य शासन खर्च करणार आहे. उड्डाणपुलामुळे स्थानकाबाहेरील रेल्वे गेट क्र मांक ६१ वर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळणार आहे.महाराष्ट्र गुजरात सीमेलगतचे घोलवड रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून सुविधेपासून वंचित असल्याने गैरसोईचे स्थानक म्हणून ओळखले जाते. प्रवाशांना होणाऱ्या असुविधांबाबत नेहमीच लोकमतने बातमीतून प्रकाश टाकला आहे. आजही फलाट क्र मांक एकचा प्रश्न, रिटर्न तिकीटाची असुविधा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणे आदी मागण्या प्रलंबितच आहेत, असे असतांना स्थानकात पायाभूत सुविधांच्या कामाला प्रारंभ झालेला दिसून येत आहे. त्याच बरोबर घोलवड रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला रेल्वेने मंजूरी दिली आहे. उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लागावा या करिता विधान परिषद आमदार आनंद ठाकूर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेत, २०१४-१५ च्या अर्थ संकल्पात मंजूरी दिली होती. मात्र रेल्वेकडे निधी नसल्याने उड्डाणपूलाचे काम रखडले होते. नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन, राज्य शासनाने त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी केली होती. ती मान्य झाली आहे. या पूलाचा ४९ कोटींचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे येथील रेल्वे प्रवाशी, नागरिक, बागायतदार आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, संबंधित स्थानकात उड्डाणपुल नसल्याने ६१ क्र मांकाच्या रेल्वे गेटवरून कोसबाड मार्गे डहाणूच्या दिशेने होणाऱ्या रस्ते वाहतुकीला ट्राफिकजाम मधून मुक्ती मिळणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वेने देखभाल दुरूस्तीकरिता सदर गेट बंद केल्यानंतर प्रखरता अधिक जाणवली होती.