शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

४०० टन रासायनिक घनकचरा (स्लज) उघड्यावर पडून

By admin | Updated: May 30, 2017 05:09 IST

तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन

पंकज राऊत /लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसी च्या अधिपत्याखाली असलेल्या सम्प नंबर तीन मध्ये वर्षानुवर्षांपासून साचून राहिलेला सुमारे ४०० टन रासायनिक घनकचरा (सांड पाण्यातील गाळ/स्लज ) सांडपाण्याचा दर्जा सुधारणयांसाठी तारापुर एनव्हायरोमेन्ट प्रोटेक्शन सोसायटी (टी ई पी एस) ने पुढाकार घेवून बाहेर काढला मात्र तो उघडयावर पडून आहे. पावसाळ्या पूर्वी त्याची विल्हेवाट न लावल्यास पावसाच्या पाण्यासोबत तो खारेकुरण, मुरबा खाडीत वाहून जाण्याची शक्यता आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळा कडून तारापूरच्या उद्योगांवर कारवार्ई होण्याच्या भीतीने सम्प नंबर तीन मध्ये साठून रहिलेला रासायनिक घनकचरा तारापुरचे २०० कारखाने तात्पुरते बंद ठेवून एक जेसीबी व पोकलेन आणि सुमारे १५० कामगार लावून काढण्यात आला आहे. प्लास्टिक वर जमा करून तो सुकविलाही आहे तो मुंबई वेस्ट मैनेजमेंटकडे विल्हेवाटी करीता तातडीने पाठविणे गरजेचे आहे मात्र एमआयडीसी व टीईपीएस या दोन संस्थांमध्ये त्याचा खर्च कोणी करावा या वादामुळे तो सध्या उघडयावरच पडलेला आहे. या स्लज ची तातडीने विल्हेवाट न लावल्यास खारेकुरण मुरबा-खाडीतील मच्छीवर तसेच आरोग्यवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सम्प तीन ७० टक्के गाळाने व्यपाल्याने तसेच पंचवीस वर्षात काढला न गेल्याने त्याचा विपरीत परिणाम सीईटीपीच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पहाणीत निदर्शनास आल्या नंतर त्यांनी टीमा व टीईपीएस यांना सम्प ३ मधील गाळ काढण्यासाठी उपाय योजण्याचे आवाहन केले होते त्या नंतर या दोन्ही संस्थानी पुढाकार घेऊन सम्प तीन मधील गाळ काढलायाबाबत ठोस व जलद निर्णय होणे अपेक्षित आहे नाहीतर हे घोंगडे भिजत राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मच्छीमारांसह शेतकरी आणि नागरिकांना भोगावा लागेल.एमआयडीसीने जबाबदारी झटकलीहा घनकचरा एमआयडीसीने तळोजा येथील मुम्बई वेस्ट मॅनेजमेंट ला पाठवावा असे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच टीईपीएसने एमआयडीसीला दिले आहे. हा मात्र या घनकचऱ्यांची विल्हेवाट तातडीने लावणे एमआयडीसीला शक्य नसल्याने विलंब लागेल. त्यामुळे हे काम टीईपीएसनेच करावे असे एमआयडीसीच्या अधिक्षक अभियंत्यांनी सांगितल्याचे कळते या मुळे एमआयडीसी आपली जबाबदारी झटकू पाहते आहे. हेच सिद्ध होते आहे.