शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटी मिळूनही विहिरी कागदीच

By admin | Updated: December 23, 2015 00:30 IST

आदिवासीचा विकास व्हावा त्याचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने सिंचन विहिरींसाठी ४.३० कोटीचा निधी मिळून

रविंद्र साळवे,  मोखाडाआदिवासीचा विकास व्हावा त्याचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने सिंचन विहिरींसाठी ४.३० कोटीचा निधी मिळून या तालुक्यात निधी मिळूनही ही योजना बारगळली आहे. या योजनेचा मोखाड्यात पूर्णपणे बोजवारा उडाला. कारण आज अनेक विहिरी अपूर्ण तर बोटावर मोजण्याइतक्या पूर्ण झाल्या आहेत व शेतकऱ्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे प्रशासकीय मान्यता देऊनही काही रद्द केल्याचे गटविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत. मोखाडा तालुक्यात २८ ग्रामपंचायती असून ९९ टक्के जनता शेतकरी आहे व सिंचन विहिर योजनेसाठी ४ कोटी ३० लाखाचा निधी उपलब्ध करून २१५ सिंचन विहिरींना सन २०११ ते २०१२ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पाणी न लागण्याच्या कारणास्तव विहिरी वरीष्ठांकडून भूवैज्ञानिकांच्या पाहणीनंतर रद्द केल्या आहेत.या योजनेसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने अनेक विहिरी अपूर्ण तर शेतकऱ्यांची इच्छा शक्ती नसल्याने काही विहिरी रद्द करण्यात आल्या आहेत.- पी. बी. गोंडाबे, गटविकास अधिकारी, मोखाडातालुकानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे ... प्रशासकीय मान्यता २१५, रद्द केलेल्या विहिरी - ४९, सुरू केलेल्या - ९३, पूर्ण झालेल्या - ४२, खोदाई प्रगतीत - ३४, खोदाईपूर्ण - १६, बांधकाम प्रगती - ११ एकूण प्रगतीत - ५१, सुरू न केलेल्या विहिरी - ७३, रद्दसाठी प्रस्तावित - ८५, पूर्णत्वाचे दाखले - १७, पुर्णत्वाचे दाखले अप्राप्त - २५, व यासाठी ५३ लाख ६० हजार ९२४ खर्च झाला आहे. साधन सामुग्रीसाठी ४९ लाख ९२ हजार ५९७ खर्च झाला आहे. एकूण १ कोटी ३ लाख ३२ हजार १५२ रू. खर्च झाला आहे. शिल्लक ४५ लाख १८ हजार ५४९ रू. आहेत. यामुळे शासनाने करोडोच्या निधीची तरतूद करून देखील ही योजना बारगळली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.