शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यावरच्या शाळेत अवतरली थ्रीडी सूर्यमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:27 IST

चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची’, असे म्हणत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कवेत घेऊन संपूर्ण थ्रीडी सूर्यमालेचा अनुभव विजय वाघमारे गुरुजींनी दिला.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : ‘या वाऱ्याच्या बसूनी विमानी, सहल करूया गगनाची, चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची’, असे म्हणत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कवेत घेऊन संपूर्ण थ्रीडी सूर्यमालेचा अनुभव विजय वाघमारे गुरुजींनी दिला. घोलवड केंद्रातील शंकरपाडा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा अनुभव घेतला.पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावरील ही जिल्हा परिषदेची शाळा. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘विज्ञान परिसर अभ्यास’ या विषयातील ‘सूर्यमाला’ या घटकाच्या अध्यापनासाठी डिजीटल साधनांचा वापर करण्यात आला. यावेळी नेहमीप्रमाणे प्रोजेक्टर वा संगणक न वापरता ‘एक्स्प्लोरर फॉर मर्ज क्यूब’ या मोबाइल अ‍ॅपचा वापर केल्याने चक्क थ्रीडी सूर्यमालाच वर्गात अवतरली. गुरुजींनी तळहातावर पकडलेल्या मोबाइलमधून सूर्य, बुध, शुक्र , पृथ्वी हे ग्रह पाहून विद्यार्थ्यांचे डोळ्यांत आनंद मावेना. तर काही दिवसांपूर्वीच नासाच्या रोव्हर २०२० सह आपल्या नामखुणा ज्या ग्रहावर पाठविण्याचे सोपस्कार शाळेने पूर्ण केले, तो मंगळग्रह देखील विद्यार्थ्यांनी पाहिला. तर गुरू, कडा असलेला शनी, युरेनस आणि नेपच्युन आदींना पाहून विद्यार्थ्यांची चंगळ झाली. दरम्यान, आदिवासी पाड्यावरच्या शाळेत असे तंत्रस्नेही शिक्षक लाभल्याने थ्रीडी सूर्यमाला पाहण्याचा अनुभव मिळाला.>सूर्यमाला कशी पाहणारसूर्यमालेचा थ्रीडी अनुभव देण्यासाठी गुगल प्लेस्टोरवरच्या ‘एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर त्याचा मार्कर इमेज असणारे मर्ज क्यूबची प्रिंट अ‍ॅपवर स्कॅन करून घेतल्यास प्रत्यक्ष सूर्यमालाच पाहायला मिळते.>मानवी कक्षेबाहेरील खगोलीय संकल्पना तारे ग्रह उपग्रह धूमखेतू उल्का, इत्यादी घटक शिकवताना प्लेस्टोअरवरील विविध शैक्षणिक अ‍ॅपचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना खगोलीय संकल्पना समजण्यास मदत होते.’- विजय वाघमारे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शंकरपाडा)