शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

३६० आदिवासी कुटुंबांना मिळाली दिवाळी भेट

By admin | Updated: November 7, 2015 22:21 IST

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!

विक्रमगड : जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुलेतोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!या संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीला साध्य करत युवा हितकारिणी संघ, भारतीय युवा शक्ती मुंबई (कुर्ला) व समृद्ध जीवन सामाजिक संस्था कुंर्झे यांच्या विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथील शांतीरतन विद्यामंदिर विद्यालयातील ५४० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व परिसरातील ३६० आदिवासी कुटुंबांना या वेळी दिवाळी भेट देण्यात आली.तालुक्यातील कोंडगाव येथील शांतीरतन विद्यामंदिर विद्यालयात १००० हून अधिक आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी मोजक्याच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असल्याचे दिसून आले. त्यावर तालुक्यातील समृद्ध जीवन सामाजिक संस्थेने ही गंभीर बाब ध्यानी घेऊन त्यांनी अवघ्या सहा दिवसांत २५०० पाठ्यपुस्तके उपलब्ध करून त्यांचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांना हा दिवस अगदी आनंदाचा व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा मोलाचा ठरला.या वेळी कोंडगाव, करसूड व विलशेत या गावांमधील ३६० गरजू व आदिवासी कुटुंबांना दिवाळी भेट म्हणून साखर, चणाडाळ, ब्लँकेट, कपडे व इतर अशा २१ जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच सर्वांना भोजन देऊन भजने व आदिवासी गाणी गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर, या वेळी या शाळेतील अधीक्षक पष्टे सर, कोम सर व आतकरी सर यांनी या भक्तांचे विशेष आभार मानले. या दोनही कार्यक्रमांमुळे परीसरातील आदीवासी बांधवात समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)