शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी खासदारांचे २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:41 IST

राजेंद्र गावितांनी जिल्हाधिकाऱ्यांसह केली पाहणी। समस्यांचा घेतला आढावा

हितेन नाईक पालघर : सातपाटी खाडीत साचलेला गाळ, अपूर्ण धूपप्रतिबंधक बंधारा, मासेविक्री मार्केट आणि ओएनजीसीची भरपाई आदी महत्त्वपूर्ण समस्यावर उपाय योजिण्यासाठी खासदार राजेंद्र गावितासह जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सातपाटीला भेट दिली. यावेळी खासदारांनी २५ लाखाचा निधी गाळ काढण्यासाठी जाहीर केला.

सातपाटी हे एक प्रगतीशील मासेमारी बंदर असून सुमारे ४०० बोटीद्वारे मासेमारी केली जाते. कोट्यवधींच्या मत्स्यविक्रीच्या उलाढालीनंतर लाखो रुपयांचे परकीय चलन शासनाला या व्यवसायातून मिळवून दिले जात असतांना त्यांच्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर उपाययोजना आखण्यात मात्र राज्य व केंद्र सरकारला अपयश आले आहे. या गावातील सुमारे ६.५ किलोमीटर क्षेत्रात गाळ साचला असून धूपप्रतिबंधक बंधाºयाचे अपूर्ण काम, ओएनजीसीकडून न मिळालेली नुकसान भरपाई, मासळी मार्केटचे काम आजही पूर्ण होत नसल्याने खासदार राजेंद्र गावित व मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. प्रधान सचिव गगराणी यांनी या संदर्भात व्हीडिओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधून संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाºयांची आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.

खासदार गावित, जिल्हाधिकारी डॉ. शिंदे, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, अणुऊर्जा प्रकल्पाचे सहव्यवस्थापक ए.के.राजपूत, सरपंच अरविंद पाटील, पं.स. सदस्य मुकेश मेहेर, चेअरमन राजन मेहेर, पंकज पाटील, पंकज म्हात्रे, कृती समितीच्या नेत्या ज्योती मेहेर, विविध विभागाचे अधिकारी, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ आदींनी खाडीतील गाळ, धूपप्रतिबंधक बंधारा, मासळी मार्केट आदी कामांची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन समस्यांची पाहणी करीत जिल्हाधिकाºयांनी सर्व अडचणी समजून घेतल्या. यावेळी ६.५ कि.मी. खाडीत एकूण ६ लाख २१ हजार क्युबिक गाळ साचला असून तो काढण्यासाठी ३१ कोटीच्या निधीची गरज भासणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने बजेट मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सादर केले आहे. त्यांनी ते राज्य शासनाकडे पाठवले असून त्याला मान्यता मिळून निधीची उपलब्धता लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खाडीच्या नौकायन मार्गासमोरील खडक फोडून त्यातून मार्ग काढण्यास स्थानिक मच्छीमारांचा विरोध असून नौकायन मार्गातून गाळ काढण्यास सुरुवात करून प्राथमिक स्वरूपात ९०० मीटरपर्यंतचा भाग गाळ काढून बोटी जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी राजन मेहेर यांनी उचलून धरली. गाळ काढून तो जमिनीवर टाकण्यासाठी जमीन उपलब्ध नसल्याने दांडा पाड्याच्या किनाºयालगत वाढलेले अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना गटविकास अधिकाºयांना दिल्या.

२५ लाखही पडणार कमीचधूप प्रतिबंधक बंधाºयाच्या १४०० मीटर्स लांबीच्या मागणीपैकी ४५० मीटर्सचे काम सुरू असून ८० मीटर्सच्या नवीन कामाला मंजुरी मिळाली असून अजून ४२५ मीटर्सच्या कामाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती पतन विभागाचे चौरे यांनी दिली. मासळी मार्केट कामासाठी २५ लाखांचा निधी अपुरा पडत असल्याने तो वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ओएनजीसीकडून मिळणारी नुकसान भरपाई, हद्दीचा वाद याबाबत चर्चा झाली.