- राहुल वाडेकर, विक्रमगडविक्रमगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २३७ शाळा असून त्यातील २४ शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० हून कमी असल्याने या शाळा भविष्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ कारण २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच जि. प. शिक्षण विभाग व शाळांवरील रिक्त असलेली पदे या सर्वाचा परिणाम एकंदरीत जिल्हा परिषद शाळांवर दिसून येत असून मुलांची पटसंख्या घटतांना दिसत आहेत़ विक्रमगड तालुक्यातील २४ केंद्रा अंतर्गत ठाकुरपाडा, आरजपाडा, चौधरीपाडा, फुफाणेपाडा, फुटखंडपाडा, फणसपाडा, चौधरीपाडा, तांबडीपाडा, रडेपाडा, म्हसेपाडा(साखरे), म्हसेपाडा (वाकी), गिंभलपाडा, खोरीपाडा, बोरसेपाडा, धोदडेपाडा, वडोलपाडा, झोपपाडा, वेडगेपाडा, सहारेपाडा, नडगेंपाडा, पलाटपाडा, खुडेद, अवचितपाडा, भोईरपाडा आदी शाळांची विदयार्थी पटसंख्या ही २० पेक्षा कमी असल्याने या शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे़तालुक्यातील बहुतेक शाळा हया आदिवासी बहुल भागात असल्याने आदिवासी मुलांच्या शैक्षणिक भवितव्यांवर परिणाम होऊ लागला आहे़ अनेक शाळांमध्ये सुविधांचा वनवा आहे़ विदयार्थ्यांसाठी स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची सोय अशा गरजांमध्ये योग्य नियोजन नाही़ या सुविधा अपुऱ्या आहेत़ शासनाने जिल्हा परिषद शाळांना प्रोजेक्टर दिलेले आहेत मात्र त्यांच्या वायर दिलेल्या नाहीत व सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस आहे़ परंतु अनेक शाळांमध्ये वीज नाही, वीज आहे तर तिचा पुरेसा दाब नाही. बल्ब दिव्याप्रमाणे मिणमिणतात़ त्यामुळे जिल्हा पषिदेच्या प्राथमिक शाळांमधील वातावरण बिघडले असून याचा फटका मुख्यत:आदिवासी मुलांनाच बसणार असल्याचे चित्र आहे़शिक्षण विभागाचे धोरण चुकले कुठे...पालघर जिल्यांतील पाच तालुक्यांना गट शिक्षणाधिकारी नाहीत. मोखाडा, डहाणु व पालघर हे तालुके वगळले तर जव्हार, तलासरी, वसई, विक्रमगड, वाडा या पाच तालुक्यांची जबाबदारी विस्तार, अधिकारी सांभाळत आहेत़ तर अनेक शाळांत मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे वरिष्ठ शिक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवून वेळ मारुन नेली जात आहे़ १५० पटसंख्या असेल तरच मुख्याध्यापक देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे़ त्याचा फटका शाळांना बसला आहे़ विक्रमगड शिक्षण विभागातील गट शिक्षणाधिकारी हे पदे तालुका अस्तित्वापासुन रिक्तच असल्याने तो कारभार विस्तार अधिकारी हे पाहत आलेले आहेत़ त्यामुळे या दोन्ही महत्वाच्या पदांवर काम करीतांना त्यांना पुरेसा वेळ प्राथमिक शाळांना देता येत नसल्याच्या तक्रारी आहेत़ विद्यार्थी वाढीसाठी विशेष उपक्रमयाबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी पटसंख्या कमी असलेल्या शाळांची या शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत असे सांगीतले. एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले की,ज्या शाळांवर ३ ंिकंवा ६ अगर ७ विदयार्थी पटसंख्या आहेत़ त्या ठिकाणी दोन दोन शिक्षक व ज्या ठिकाणी १ ली ते ८ वी पर्यत असलेल्या मोठया शाळांवर विदयार्थी संख्या जास्त असतांनाही पाच ते सहा शिक्षक यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एकच शिक्षक ठेवुन दुसरा शिक्षक पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर वर्ग करावा अशी मागणी आहे़
जि.प.च्या २४ शाळा बंद पडणार
By admin | Updated: July 24, 2016 04:02 IST