शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी वसईतून कोकणात जाणार २० एसटी; एका बसमध्ये फक्त ३० प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:50 IST

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच बस सोडणार

सुनील घरत पारोळ : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून त्याचे सावट होळी सणावरही आहे. त्यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असेल असा अंदाज घेत एसटी महामंडळाकडून वसई-विरारमधून होळीसाठी कोकणात २० बसेसच सोडल्या जाणार आहेत. त्यातही प्रत्येक बसमध्ये कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून केवळ ३० प्रवासीच राहणार आहेत.

यंदा कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या पाहता शिमगोत्सव उत्साहात होणाऱ्या कोकणातीलही अनेक गावांत यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे शहरांतून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असेल, असा अंदाज आहे आणि कोकणात जाऊ इच्छिणारे चाकरमानी धोका टाळण्यासाठी सार्वजनिकपेक्षा खासगी वाहनांचा आधार घेण्याच्या विचारात आहेत. तरीही सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून कोकणाकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धूलिवंदन आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधून कोल्हापूर, खेड, महाबळेश्वर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण या गाड्या २७ मार्चला १० वाजता व २८ मार्चला १० वाजता सोडण्यात येणार असून, २ मार्च व ३ मार्चला या बस परतीचा प्रवास करणार आहेत. अर्नाळा, नालासोपारा, वसई आगारातून या गाड्या धावणार असून, प्रत्येक बसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. गेल्या वर्षी शिमगोत्सवानिमित्त वसई - विरारमधून २३ ते २४ बस कोकणाकडे धावल्या होत्या, मात्र यंदा कोरोनामुळे ही संख्या थोडी कमी केली आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गावात येणाऱ्यांना कोरोनाचा रिपोर्ट बंधनकारक असेल असे आदेश काढले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी हा रिपोर्ट करावा लागणार आहे.

कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसमध्ये ३० प्रवासी असणार आहेत. तसेच गाडीत प्रवासादरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून, मास्क बंधनकारक आहे. गाडीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. - राजेंद्र जगताप, नियंत्रक, एसटी पालघर विभाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या