शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील २९ गावे पुन्हा लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:38 IST

सुनावणी निवडणुकीनंतर; १० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्याची सुनावणी बुधवारी होणार होती. मात्र, या प्रकरणी तातडीची आवश्यकता नसल्याचे सांगत निवडणुकीनंतर पुढील सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता गावांचा निकाल हा निवडणुकीनंतर लागणार आहे.२००९ मध्ये तत्कालीन चार नगरपरिषदा आणि ५३ ग्रामपंचायती मिळून वसई - विरार शहर महापालिका स्थापन करण्यात आली. मात्र, वसईच्या पूर्व - पश्चिम पट्ट्यातील २९ गावांनी महापालिकेत जाण्यासाठी जोरदार विरोध केला होता. मात्र, गेल्या १० वर्षांत गावे काही वगळली गेली नाहीत. सभा, आंदोलन, उपोषण, मोर्चे, विविध समित्या, आश्वासने, न्यायालयीन प्रक्रिया, कायदेशीर अडचणी यात गावांचा प्रश्न पार भिजत राहिला. मधल्या काळात राज्य सरकारने गावे वगळण्याची अधिसूचना रद्द करण्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करून गावांचा समावेश महापालिकेत करावा, असे प्रतिज्ञापत्र जानेवारी २०१५ मध्ये सादर केले होते. मात्र, हे प्रतिज्ञापत्र पुन्हा मागे घेत मे २०१८ च्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी गावांचा समावेश करण्याचे जाहीर केले गेले. त्यानुसार गावे वगळण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी पुन्हा सादर करण्यात आले होते.त्यानंतर झालेल्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी तारीख पे तारीखचा हा सिलसिला सुरूच आहे, आणि आता तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने हा प्रश्नच गुंडाळून टाकण्यात आला आहे. किंबहुना बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. तर आता या प्रकरणाची सुनावणी थेट निवडणूक झाल्यानंतरच होणार असल्याचे जनआंदोलनचे प्रफुल ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार