शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१७ कोटींचे कर्ज होणार माफ

By admin | Updated: June 15, 2017 02:36 IST

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांतून ३१ मार्च २०१७ पर्यंत वितरित केलेल्या पीक कर्ज व कृषी मध्यम कर्ज अशा दोन्ही प्रवर्गातील एकूण ३ हजार ४६ अल्प,अत्यल्प व इतर शेतकऱ्यांचे

- निखिल मेस्त्री । लोकमत न्यूज नेटवर्कनंडोरे : जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांतून ३१ मार्च २०१७ पर्यंत वितरित केलेल्या पीक कर्ज व कृषी मध्यम कर्ज अशा दोन्ही प्रवर्गातील एकूण ३ हजार ४६ अल्प,अत्यल्प व इतर शेतकऱ्यांचे सुमारे १७ कोटी ४७ लाख रुपयाचे कर्ज राज्यशासनाच्या निर्णयामुळे माफ होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.लोकमतने पालघर जिल्ह्यात बळीराजाचे कर्ज होणार माफ या मथळ्याखाली ठाणे जिल्हा बँकेच्या पीक कर्जदार शेतकऱ्यांची जिल्ह्यानिहाय कर्जमाफीची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील १ हजार ४ अल्प भूधारक शेतकऱ्यांना आजतागायत ५ कोटी ७५ लाख, ७५९ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४ कोटी ३५ लाख व २ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या १ हजार २८३ शेतकऱ्यांना ७ कोटी ३७ लाख असे सर्व प्रवर्ग मिळून एकूण ३ हजार ४६ भूधारक शेतकऱ्यांना १७ कोटी ४७ लाख इतके कर्जवाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१७ पर्यंत राष्ट्रीयकृत व जिल्हा बँक असे मिळून २१ हजार २२९ भूधारक शेतकऱ्यांना जिल्ह्यात १४१ कोटी २७ लाख इतके कर्ज वितरित केलेले आहे. तसेच ३१ मार्च ते आजतागायत जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत सुमारे ३२ कोटी रु पयाचे कर्ज वाटप करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जमाफीत हे सर्व कर्ज सरसकट माफ होणार आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता प्रत्यक्षात हे कर्ज कधी माफ होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.