शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दंडाच्या कचाट्यात १५० इमारती

By admin | Updated: July 13, 2016 01:40 IST

शहरातील जी बांधकामे अधिकृत आहेत, पण ज्यांना भोगवटा दाखला मिळालेला नाही, अशा इमारतींना (दुप्पट मालमत्ताकर) दंड लावण्याचा प्रकार पालिकेने केला आहे

राजू काळे,  भार्इंदरशहरातील जी बांधकामे अधिकृत आहेत, पण ज्यांना भोगवटा दाखला मिळालेला नाही, अशा इमारतींना (दुप्पट मालमत्ताकर) दंड लावण्याचा प्रकार पालिकेने केला आहे. अशा इमारतींना दंड न लावण्याचा आदेश तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी २०११ मध्ये दिला होता. त्याला कर विभागाने केराची टोपली दाखवली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून १५० इमारतींमधील रहिवासी हा दंड रद्द करण्यासाठी पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.राज्य सरकारने १९८८ मध्ये पालिका हद्दीतील बेसुमार वाढलेल्या अनधिकृत बांधकामांवरील उपाययोजनेसाठी माजी सनदी अधिकारी दिनेश अफजलपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने तयार केलेला अहवाल यापूर्वीच्या युती सरकारला १९९८ मध्ये सादर केला. त्यात पालिका अधिनियमातील कलम २६७ (अ) प्रमाणे अनधिकृत बांधकामांना दंड आकारण्याची शिफारस केली होती. त्याचा निर्णय युती सरकारकडून प्रलंबित राहिल्यानंतर १ एप्रिल २००८ रोजी आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली. त्यानुसार, मीरा-भार्इंदर पालिकेच्या १० एप्रिल २००८ च्या महासभेत बेकायदा इमारतींना दंड लावण्याचा ठराव मंजूर केला. त्यात ज्या इमारतींना नगररचना विभागाने बांधकाम प्रारंभपत्र दिले आहे, त्या इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले आहे. पण, त्यांनी भोगवटा दाखला न घेताच सदनिका विकून त्यांचा वापर सुरू केला. त्याची तपासणी करून बेकायदा बांधकाम अथवा ठरावीक जागेत वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कर विभागाने केवळ अशा बांधकामांना दंडाचा निर्णय घेतला. परंतु, कर विभागाने सरसकट संपूर्ण इमारतीलाच दंड लावण्याचा विक्रम केला. कर विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे संतप्त रहिवाशांनी दंडास नकार दिला. अशा प्रकारे अनेक इमारतींना कर विभागाने दंडाच्या कक्षेत आणल्याने त्यांनी प्रशासनासह राजकारण्यांकडे धाव घेतली. त्यावर, तत्कालीन आयुक्त नाईक यांनी ३१ मे २०११ रोजी आदेश काढून त्यात ज्या इमारतींना परवानगी दिली आहे, त्यांचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वास्तुविशारदाकडून नगररचना विभागाला मिळाले असल्यास, परंतु भोगवटा दाखला घेतला नसल्यास अशा इमारतींना दंड लावू नये, असे निर्देश दिले. या आदेशाला काही बुद्धिजीवी अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून दंड आकारणी सुरूच ठेवली. त्यात कहर म्हणजे स्थानिक लेखा निधी यांनीही त्यांच्या लेखा अहवालातील आक्षेपामध्ये भोगवटा दाखला न घेतलेल्या इमारतींकडून दंड वसूल करण्याचे समर्थन केले.