शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

गंभीररीत्या भाजलेल्या रूपालीवर १२ तासांनी उपचार

By admin | Updated: April 23, 2017 03:49 IST

तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षीय रूपाली वरठा गुरुवारी सायंकाळी तिच्या घराजवळच्या

- हितेन नाईक,  पालघर

तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षीय रूपाली वरठा गुरुवारी सायंकाळी तिच्या घराजवळच्या वीजवाहिनीचा झटका लागून गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचारासाठी तिच्या नातेवाइकांना पालघर, ठाणे, मुंबई असा तब्बल १२ तासांचा प्रवास करावा लागला. सध्या ती सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.लहानपणीच आईचे छत्र हरवलेली रूपाली आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना कुंभाची फळे तोडण्यासाठी झाडावर चढली. जवळच्या वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने ती बराच वेळ चिटकून होती. काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून विद्युतपुरवठा खंडित करून तिला खाली उतरवले.महत्प्रयासाने ठाणे जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या सुमारास पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जखमेने विव्हळत असलेल्या रूपालीला रुग्णवाहिकेने जे.जे.मध्ये नेण्यात आले. तेथे प्रथम कागदपत्रे बनवण्यात खूप वेळ गेला. तेथे तब्बल अर्धा ते पाऊण तास तिला या अवस्थेत ताटकळत राहावे लागले. सर्व सोपस्कारांनंतर शेवटी तिला जे.जे.मध्ये दाखल केले. मात्र, जळालेल्या रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला दुसरीकडे हलवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पुन्हा तिला केईएम किंवा सायनला हलवण्याची तयारी सुरू झाली. मात्र, जे.जे.मध्ये झालेले हाल पाहता रूपालीच्या नातेवाइकांनी नायर जवळ असल्याने तेथे हलवण्याचा निर्णय घेतला. शेवटी, शुक्रवारी सकाळी ९ वाजता नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी ५.३० पासून तिच्यावर खऱ्या अर्थाने उपचार सुरू झाले.सुरूवातीला ग्रामस्थांनी तिला मासवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, योग्य उपचाराची कमतरता असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे नेण्यात आले. तिथेही तिच्यावर योग्य उपचार सुविधा नसल्याने शेवटी पालघरमधील ढवळे रुग्णालयात दाखल करून तिच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा तातडीने मुंबई येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला. वेदनेने ती तळमळत असताना मुंबईला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला ढवळेतून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे पर्यायी बर्न केअरसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगितले. - जखमेने विव्हळत असलेल्या रूपालीला रुग्णवाहिकेने जे.जे.मध्ये नेण्यात आले. तेथे कागदपत्रे बनवण्यात अर्धा ते पाऊण तास गेला. त्यानंतर मात्र, जळालेल्या रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला दुसरीकडे हलवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.