शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१११ अंगणवाड्यांना स्वजागाच नाही

By admin | Updated: March 1, 2016 01:57 IST

विक्रमगड तालुक्यातील २४६ अंगणवाड्या व ४९ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ परंतु विक्रमगड तालुक्यातील १११

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील २४६ अंगणवाड्या व ४९ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत़ परंतु विक्रमगड तालुक्यातील १११ अंगणवाडया शासकीय इमारतीमध्ये जागा नसल्याने त्या भाडोत्री इमारतीत भरविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून बाल विकास प्रकल्पतंर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयापाडयात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यांत येत आहेत़. परंतु त्यांना स्वत:ची जागा असावी, अशी काळजी मात्र घेतली जात नाही. अगोदरच शासनाकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत त्यात स्वत:ची इमारत नसल्याने अनेक अडचणी समोर येत असतात विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडया व मिनी अंगणवाडयांसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातून निधी दिला जातो. तरीही तालुक्यातील २४६ अंगणवाडी केंद्रांपैकी फक्त १३५ केंद्राना स्वत:ची इमारत आहे. तर १११ अंगणवाडया या खाजगी किंवा समाज मंदिरात भरविल्या जातात़ शासनाची अथवा स्वत:ची इमारत नसल्याने जागे अभावी अनेक सुविधां विना या अंगणवाड्या आज चालविणे भाग पडते आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागते आहे. शासनाने अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे धोरण स्वीकारले असले तरी निधी अभावी त्यांची पूर्तता योग्य वेळेत होत नाही. (वार्ताहर)