शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन बसच्या धडकेने १ ठार

By admin | Updated: March 27, 2017 05:33 IST

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने रिक्षातून उतरत असतांना नविलसंग मानिसंग यांचा

वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने रिक्षातून उतरत असतांना नविलसंग मानिसंग यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ गुरूवारी संध्याकाळी हा अपघात झाला होता. वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची बस ( एमएच ४८ के २०१) ही वसईच्या दिशेने येत होती. वसई फाट्याजवळ नविलसंग रिक्षातून उतरत होते. महापालिकेच्या बसने वळण घेताना त्यांना धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांना वालीव येथील गोल्डन पार्क या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वसईच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या परिवहन सेवेचा बस चालक हा बेदरकारपणे चुकीच्या दिशेने गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. मात्र चालक आणि वाहकांच्या बेशिस्तीच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे ठेकेदाराने ३७ बसवाहकांना निलंबित देखील केले होते. तसेच वाहने कशी चालवावी आणि प्रवाशांशी कसे वागावे हे सांगण्यासाठी कर्मचा-यांचे प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित करण्यात आले आहेत. तरीदेखील वाहकांच्या बेशिस्त वाहन चालविण्याच्या प्रकारात घट झाली नसल्याचे या अपघातानंतर उजेडात आले आहे.दोषी चालक मोकाटच!संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही संबंधित चालकावर नियमानुसार कारवाई करू, असे परिवहन सेवा चालविणाऱ्या कंपनीचे संचालक मनोहर सकपाळ यांनी सांगितले.