शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

देश आणि देहासाठी युवकांनी एक तास द्यावा- एन. सुब्बाराव

By admin | Updated: June 30, 2015 02:45 IST

मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच

नेहरू युवा केंद्राची पुनर्जागरण यात्रा : खासदारांनी दाखविली हिरवी झेंडीवर्धा: मनाचे संतुलन, दृढ आत्मविश्वास स्वामी विवेकानंदाच्या अध्यात्मिक शिकवणीवर आजच्या युवकांनी भर द्यावा, तसेच देशासाठी आणि देहासाठी रोज एक तास देऊन ग्रमोद्योगाला चालना देण्यासाठी पुढे यावे, असे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते एन. सुब्बाराव यांनी केले.विकास भवन येथे सोमवारी नेहरू युवा केंद्राच्या पुनर्जागरण यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते यांची उपस्थिती होती. खा. तडस म्हणाले, देशात परिवर्तन केवळ युवकच घडवू शकतात. प्रत्येक अडचणीवर युवकच प्रभावीपणे मात करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रतिनिधींनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत मिळवून द्याव्यात. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून पुनर्जागरण यात्रा सुरू होत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.नेहरू युवा केंद्राच्या या उपक्रमातून नेतृत्त्वाची उभारणी होण्यास मदतच होणार आहे. याच युवकांच्या माध्यमातून त्यांना प्रशासनाकडून प्रशिक्षित करून शासनाच्या विविध योजना पथनाट्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत यापुढेही पोहचविण्याचा विचार करण्यात येईल. या युवकांकडून जनसामान्यांच्या असलेल्या अडीअडचणीही समजून घेण्यास मदतच होणार आहे. ही यात्रा १०४ गावात पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती देणार आहे. या यात्रेचा युवकांनी अधिकाधिक फायदा घेऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यावेळी म्हणाले. प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी केले. तसेच एन. सुब्बाराव यांचा परिचय करून दिला. शेतकरी आत्महत्येवर आधारित पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. पथनाट्याच्या यात्रेला एन. सुब्बाराव यांच्या उपस्थितीत खा. तडस, जिल्हाधिकारी सलील यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा युवा सल्लागार समितीचे हेमचंद्र वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे प्रा. मोहन गुजरकर यावेळी उपस्थिती होते.(प्रतिनिधी)