शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

योग्य मोबदल्यासाठी कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:41 IST

औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारविरोधी धोरण राबविल्या जात असल्याने कंपनी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेचे आंदोलन : गॅमन इंडिया कंपनी प्रशासनाविरोधात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. इतकेच नव्हे तर कामगारविरोधी धोरण राबविल्या जात असल्याने कंपनी प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनंता देशमुख यांच्या नेतृत्त्वात कामगारांनी हे आंदोलन केले. कामगारांनी कंपनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करून आपल्या न्याय्य मागण्या कंपनी प्रशसनातील अधिकाऱ्यांना पटवून दिल्या. येथील औद्योगिक वसाहतीतील गॅमन इंडिया कंपनीत कार्यरत कामगारांच्या न्याय हक्कांना डावलुन त्यांच्यावर कारखाना प्रशासनाच्यावतीने मनमानी केली जात होती. अरेरावी व मनमर्जी काम करण्याची पद्धत अवलंबिली जात होती. मागील तीन वर्षांपासून ठेकेदार पद्धतीत काम करूनही वेतनवाढ न करता प्रतिदिवस ३३६ रूपये देऊन कामगारांची बोळवण करण्यात येत होती. तसेच इतर सवलतीपासून कामगारांना वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वेतन पावती मिळत नसल्याने नेमके वेतन मिळते तरी किती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ओटी दरम्यान जेवणाचा डबा व ओटीचे अतिरिक्त पैसे मिळाल्याची तसेच सिक्युरीटीतील वानखेडे व कांबळे यांच्याकडून नेहमी अपमानित केले जात असल्याची कामगारांची तक्रार होती. कामगारांना प्रतिदिवस ४५० रूपये याप्रमाणे पगार देण्यात यावा तसेच दरवर्षी पगारवाढ करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. दुपारी २ नंतर कंपनी प्रशासनाच्यावतीने वैभव देशमुख, अजय भाके, तसेच शिवसेनेच्यावतीने जिल्हा उपप्रमुख अनंत देशमुख, तालुकाप्रमुख विलास निवल, शहर प्रमुख महेश जोशी व मुन्ना तिडके यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना