शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

५५ वर्षे जुन्या इमारतीतून कामकाज

By admin | Updated: May 29, 2015 01:55 IST

तालुक्यातील ६३ ग्रा.पं. चा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज आजही ५५ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे.

विजय माहुरे  सेलूतालुक्यातील ६३ ग्रा.पं. चा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज आजही ५५ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे. जीर्ण झालेल्या इमारतीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पंचायत समितीची नवीन इमारतीची प्रतीक्षा कधी पूर्ण होणार, हा प्रश्नच आहे.१९६१ मध्ये पंचायत समितीचा कारभार सुरू झाला, तेव्हा सेलू-हिंगणी मार्गावर प्रशस्त अशा विस्तीर्ण जागेवर ही इामरत उभी करण्यात आली. १९६२ मध्ये मोही येथील अमृत काटकर यांना प्रथम सभापती होण्याचा मान मिळविला. या परिसरात सभापतीचे निवासस्थान, गटविकास अधिकारी, पं.स. मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे निवासस्थान येथेच होते. ते याच वसाहतीत वास्तव्यास राहत असत. अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याने कामकाजाला गती मिळत होती; पण सध्या पं.स. मधील निवासस्थाने मोडकळीस आली आहे. काही इमारतीचे साहित्यही लंपास झाले. १५ वर्षांपूर्वी याच परिसरात सभापती निवासस्थान बांधण्यात आले; पण या निवासस्थानात कोणत्याही सभापतींनी वास्तव्य केले नाही. ती इमारत सध्या गोडावून म्हणून वापरात आहे. शिक्षण, पशुसंवर्धन व महिला बाल विकास विभागाचा कारभार १५ बाय १५ च्या पडक्या इमारतीतून सुरू असला तरी पंचायत समितीच्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, पंचायत, कृषी व लेखा कार्यालय आहे. या कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना उभे राहण्यासाठीही जागा नाही. यामुळे त्रास सहन करावा लागतो. एक विस्तार अधिकारी, टपाल विभाग व समाजकल्याण या विभागाचे तीन अधिकारी रेकॉर्ड रूममधून कामकाज करतात. पं.स. सभागृहात विविध योजनेतील साहित्य ठेवण्याची वेळ आली आहे. कृषी साहित्यासाठी पं.स. कार्यालयापासून दीड किमीवर गोदाम किरायाणे घ्यावे लागले. परिसरातील पडक्या इमारती पं.स.ची दुरवस्था दर्शवित आहे. राजकीयदृष्ट्या येथील पंचायत समितीचे जिल्ह्यात वजन आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर ‘अच्छे दिन’ वाल्यांचे सरकार आहे आणि आमदार, खासदार तसेच राज्य आणि केंद्रातही एकछत्री सत्ता आहे. यामुळे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या दृष्टीने प्रयत्न होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.