शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचारी घेताहेत ‘डबडब-टनटन’चा कानोसा

By admin | Updated: June 20, 2014 00:00 IST

पावसाळ्याच्या दिवसात वेळी अवेळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होतो. तो सुरळीत करण्याकरिता कर्मचारी विद्युत खांबावरील इन्सुलेटर्सवर पाना-पेनचिस मारत ‘डबडब-टनटन’चा कानोसा घेत असल्याचे चित्र आहे.

रूपेश खैरी - वर्धापावसाळ्याच्या दिवसात वेळी अवेळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होतो. तो सुरळीत करण्याकरिता कर्मचारी विद्युत खांबावरील इन्सुलेटर्सवर पाना-पेनचिस मारत ‘डबडब-टनटन’चा कानोसा घेत असल्याचे चित्र आहे.सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या कारणाचा शोध घेतला असता विजेचे वहन करणाऱ्या पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर्समध्ये शिरणारे पाणी असल्याचे समोर आले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर अशा इन्सुलेटर्सचा शोध घेण्याकरिता भर पावसात कर्मचारी फिरत आहेत.संतश्रेष्ठ गोरोबा कुभारांनी मातीच्या मटक्यांना आकार देत संतवाणीच्या ओव्या लिहिल्या. मटके तयार झाल्यावर पाणी भरून ठेवण्याच्या स्थितीचे झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांना साहजीकच मटक्यांना ठोकून ठोकून वाजवून पाहावे लागले नसेल तर नवलच. तसाच काहीसा प्रकार महाविरणच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडतोय. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजयंत्रणेत लावलेल्या पीन इन्सुलेटर, डिस्क इन्सुलेटरर्सना तपासण्यासाठीही हाच ठोकताळा वापरावा लागत आहे. ही पद्धत वर्षानुवर्षे स्टेथेस्कोपप्रमाणे तपासून वीजपुरवठा पुर्ववत करण्यात मदतगार साबीत होत आहे. विजेचे वहन करताना विजेची गळती होवून आसपाच्या लोखंडी वस्तुंशी स्पर्श होवून होवू नये व विजेचे समान वहन होणे हे इन्सुलेटर्स व डिस्क इन्सुलेटर्सचे महत्त्वाचे कार्य आहे; परंतु विजेचे वहन करताना हेच जास्त गरम होत असतात. मग पावसाळ्यांच्या दिवसात थोडेही पाणी पडले की, त्यांना तडा जावून, त्यात पाणी शिरले की वीजपुरवठा ठप्प.. लोकांची बोंबाबोंब... वीज कर्मचारी किंवा जनमित्रांना मग वीजखंबावर चढून आपले कान या अशा अनेक इन्सुलेटर्स किंवा डिस्क इन्सुलेटर्सना अक्षरश: पाना, पेचकचने ठोकून डबडब आवाज तर येत नाही ना, याची शहानिशा करावी लागते. वरवर सोपी वाटणाऱ्या या कामात प्रदूषणाचा व्यत्यय येत असतोच; परंतु महावितरणच्या जनमित्रांची ही कसरत सुरूच असते. इन्सुलेटर्स व डिस्क इन्सुलेटर्सच्या तपासणीअंती मग जेव्हा डबडब आवाज करणारा पंक्चर झालेला इन्सुलेटर सापडतो तेव्हा तो बदलून वीजपुरवठा पुर्ववत होतो. हे कार्य करताना मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.