शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्त्रियांना आरोग्याबाबत सजग राहावे

By admin | Updated: June 26, 2015 02:12 IST

शासकीय आरोग्य योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंयत पोहचविण्यात आचार्य विनोबा रुग्णालयाचे योगदान आहे.

वर्धा : शासकीय आरोग्य योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंयत पोहचविण्यात आचार्य विनोबा रुग्णालयाचे योगदान आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आरोग्य सेवेपासून बऱ्याचदा वंचित राहतात. आदिवासी माता भगिनींसाठी आरोग्याचे वरदान असलेल्या या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच आरोग्याबाबत सजग रहावे, असे आवाहन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या शालिनी आदिवासी माता, बाल व किशोरी आरोग्य योजनेचे हिंगणी येथे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, डॉ. वंजारे, सेलू पंचायत समितीच्या सभापती मंजुषा दुधबळे, उपसभापती उल्हास रणनवरे, सदस्य अशोक कलोडे, आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, माजी उपसरपंच अशोक मुडे, अशोक रतनवार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धमाने, प्रकल्प संचालक डॉ. हरिहरन, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे, तिगांवकर, सामुदायिक औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अभय मुडे, डॉ. वसंत वाघ, सेलू आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष शर्मा, बबलू रोकडे उपस्थित होते. आदिवासीबहुल ७० गावामध्ये ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत सदर गावात घरोघरी जाऊन गर्भवती मातांची पूर्वतपासणी, बाळंत मातेची नियमित आरोग्य तपासणी, नवजात शिशूंची तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन इत्यादी सुविधा व आरोग्यसेवा प्रदान केल्या जातील, अशी माहिती अभ्युदय मेघे यांनी दिली. तर डॉ. शर्मा यांनी सेलू आरोग्य केंद्रात उपलब्ध आरोग्य सेवा, योजनांची माहिती दिली. यावेळी प्रतिभा दरणे, रुपाला भोजे, नलिनी दुर्गे, तृप्ती नक्षीणे, मंगला भेंडारे या गर्भवती मातांना माहेर कार्ड अतिथींच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. श्रुती नायक, डॉ. सौरवकुमार, आशा सेविका नीता कैकाडी, विनया भरणे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर उमाटे, गंगाधर तडस, सुलोचना मोहोड, हेमंत पुंडकर, व्यंकट सोनोने आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)