शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

संपाने तरी कर्जमुक्ती होईल का?

By admin | Updated: June 1, 2017 00:44 IST

शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे.

संपाने तरी कर्जमुक्ती होईल का? अभिनय खोपडे । लोकमत न्यूज नेटवर्क शेतकरी आजपासून संपावर जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी निर्धार जाहीर केला आहे. शेतकरी शेतात पेरणी करणार नाही व शासनाच्या धोरणाचा निषेध करणार आहे. सातबारा कोरा करा म्हणजेच कर्जमुक्ती करा, शेतमालाला हमीभाव द्या या प्रमुख मागण्या आहेत.. केंद्रातील पतंप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच तीन वर्ष पूर्ण केले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच तीन वर्ष पूर्ण करणार आहे. भाजप विरोधी बाकावर असताना कर्जमाफीची मागणी करीत होता. आता सत्तेवर आल्यानंतर अभ्यास करू म्हणत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने राज्यातील भाजप वगळता सर्वच पक्ष उभे असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कर्जमुक्तीचा मामला काही निकाली निघाला नाही. सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. सिंचनाची सोय यातून होणार आहे. तुरीच्या खरेदीला मुदतवाढ दिली. शेवटचा दाणा खरेदी करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्याच पावसात मार्केट यार्डात अनेक शेतकऱ्यांच्या तुरी भिजल्या. शेतकऱ्याच्या मुद्दयावर विरोधकांत दम दिसत नाही. अन्यथा संघर्ष यात्रेनंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाली असती. नोटबंदीनंतर बँकाच्या एटीएममध्ये खणखणाट असल्याने शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे. पीक कर्जाचे आपलेच पैसे मिळविण्यासाठी काम सोडून बांधावरचा शेतकरी बँकेच्या रांगेत उभा आहे. तरीही सरकारविषयीचा असंतोष दिसून येत नाहीे.परवा वर्ध्यात सहकार नेत्यांनी ही खंत बोलून दाखविली. विरोधकात दम नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी ‘योग्यवेळी’ देऊ असे सांगून लांबणीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळेच आता संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. हे आंदोलन प्रतिनिधीक असले तरी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी संपावर आहे. आजवर वर्धा जिल्ह्याने अनेक शेतकरी आंदोलने पाहिलीत. दिवगंत शेतकरी नेते शरद जोशी साहेबांनी १८ तासापेक्षा अधिक काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखल्या होत्या. सरकार हादरले होते. १९८० च्या दशकात केंद्रीय मंत्र्यांना गावात फिरणे शेतकऱ्यांनी कठीण केले होते. हा या जिल्हयातील शेतकऱ्यांचा दरारा होता. आज शेतकऱ्यांचे अनेक नेते व संघटना झाल्या मात्र न्याय मिळत नाही. असे चित्र आहे. त्यामुळे आता १ जून पासून संपाचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. भाजपला आता शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागेल. कर्जमाफी, वीजबिल माफीचे पोकळ आश्वासन देऊन काम भागणार नाही कृती करावी लागेल तेव्हाच शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढेल. अन्यथा पुढच्या काळात शेतकऱ्यांचा रोष शासनाप्रती वाढलेला असेल. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अनेक संस्था मोडीत निघाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा उभी करुन देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. ते हवेतच आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनाच त्यांना संपापर्यंत घेऊन येण्यास कारणीभूत ठरली आहे, यांचा विचार शासनकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.