शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

अकरा गावांतील बांधकामाचा प्रश्न निकाली निघणार?

By admin | Updated: December 10, 2014 23:01 IST

स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली होती़ यामुळे नागरिकांची गोची झाली होती़ शिवाय शहरातील रामनगर व अन्य भागातील

वर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीला लागून असलेल्या गावांमध्ये बांधकामांना परवानगी नाकारण्यात आली होती़ यामुळे नागरिकांची गोची झाली होती़ शिवाय शहरातील रामनगर व अन्य भागातील लिजचे प्रकरणही कित्येक वर्षांपासून प्रलंबित होते़ या दोन्ही प्रकरणांचा निपटारा होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत़ नगरविकास राज्यमंत्र्यांनी नागपूर येथे याबाबत गुरूवारी (दि़११) बैठकीचे आयोजन केले आहे़ नागपूर अधिवेशनातही यावर चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत़ स्थानिक नगर परिषदेचे विद्यमान हद्दीस लागून असलेल्या पिपरी (मेघे), आलोडी, नालवाडी, म्हसाळा, चिंचाळा, चितोडा, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी, दत्तपूर या ११ गावांसाठी परिसर योजना तयार करण्यात आली आहे़ याबाबत १५ जून १९९५ अन्वये शासन राजपत्रात प्रसिद्धीही करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिमेमध्ये गावठाण क्षेत्राबाहेरील बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतींना नसल्याचा उल्लेख करण्यात आला़ यामुळेच संबंधित ग्रामपंचायतींनी गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामाची परवानगी देण्याचे नाकारले आहे. गावठाण क्षेत्राबाहेर बांधकामाची परवानगी देण्याकरिता नियोजन प्राधिकरण घोषित करण्याबाबत १९ एप्रिल व १६ जुलै २०१२ अन्वये अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; पण अद्याप शासन स्तरावरून नियोजन प्राधिकरण घोषित करण्यात आलेले नाही. वर्धा जिल्हा हद्दीकरिता प्रदेश स्थापन करणे व त्यासाठी प्रादेशिक योजना (रीजनल प्लॅन) तयार करण्याबाबत कार्यालयाचे पत्र ४ डिसेंबर २०१३ अन्वये प्रधान सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अद्याप प्रादेशिक योजनाही मंजूर करण्यात आलेली नाही. यामुळे अकरा गावांतील नागरिक व बांधकाम व्यावसायिकांची गोची झाली आहे़ आता बैठकीमुळे दोन्ही प्रकरणांचा निपटारा होण्याची चिन्हे दिसत आहेत़(कार्यालय प्रतिनिधी)