शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

खते शेतकऱ्यांच्या बांधावर योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: September 5, 2014 00:00 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच

रोहणा : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच पण अलीकडे आवश्यक रासायनिक खते सहकारी संस्थाच्या व खाजगी कृषी केंद्रात देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे. यावरुन शासनाची ही योजना केवळ कागदावर असून ती पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरच रासायनिक खताचे वितरण करण्याची अभिनव योजना मागील दोन वर्षांपासून राज्यशासनाच्या कृषी विभागाने सुरू केली. पण या योजनेंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांच्या बांधावर खत शासनाने पोहचवून दिले याचा शोध घेतला तर एकही उदाहरण रोहण्यात शोधून सापडत नाही. सहकारी संस्थांच्या तसेच खाजगी कृषी केंद्रात जावून या याजनेबाबत चौकशी केली असता त्याबाबत अनभिज्ञताच व्यक्त केल्या जाते. अशीच स्थिती सात बारा योजनेची आहे. सात बाराचा दाखला पटवारी घरी तर आणून देतच नाही पण त्याच्या कार्यालयात सात बारा साठी बरा चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी पंढरा हत्ती ठरत आहे. योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)