शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पोटाच्या खळगीसाठी थरथरत्या हातांवरही भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2015 02:05 IST

घरात बसून आराम करणे, नातवंडांना सांभाळणे, कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने दोन घास द्यायचे, ही अपेक्षा वृद्धापकाळात असणे स्वाभाविक आहे;...

जगण्याची धडपड : सत्तरी ओलांडल्यानंतरही करावे लागतेय कापूस वेचणीचे कामप्रफूल्ल लुंगे सेलूघरात बसून आराम करणे, नातवंडांना सांभाळणे, कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने दोन घास द्यायचे, ही अपेक्षा वृद्धापकाळात असणे स्वाभाविक आहे; पण काठीचा आधार घेत थरथरत्या शरीराचा तोल सांभाळत कापूस वेचून पोटाची खळगी भणाऱ्या वृद्ध महिला पाहिल्या की, कुणालाही वेदना होतीलच! सध्या हे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.७० ते ७५ वर्षे वयाच्या या वृद्ध महिलांना आरामाची गरज आहे; पण त्यांना स्वत:च्या पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी संघर्षच करावा लागत आहे. ही बाब धडधाकट कामचुकार माणसांच्या डोळ्यात अंजण घालणारीच आहे. सध्या दररोज ग्रामीण भागातील महिला शेतात कापूस वेचणीला जातात. त्या महिलांसोबत काही वृद्ध महिला बरेच अंतर मागे राहत त्यांच्यासोबत शेतात कापूस वेचणीला जातात. सकाळी ९ ते १० वाजता घरून निघाल्यावर सूर्य अस्ताला गेल्यावर कापसाचे ओझे आणणे शक्य नसल्याने शेत मालकास वाहनात कापूस आणण्याची विनंती करतात. रेहकी येथील उषा लाखे यांना लकवा मारला आहे. शासनाकडून श्रावणबाळ योजनेचे मानधनही मिळत नाही. पतीचे निधन झाले. घरी सव्वा एकर शेतीचा तुकडा तीन मुले वेगवेगळी राहतात. मुलीचे लग्न झाले. उषा स्वत: वेगळ्या घरात एकाकीपणाचे जीवन जगत आहे; पण जगण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागत आहेत. सध्या त्या दिवसभरात ३० ते ४० किलो कापूस वेचतात. अशा अनेक उषा आज मुले असताना निराधाराचे जीवन जगत संघर्ष करीत आहे. ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसताना वृद्ध महिला हातात काठी घेऊन कापूस वेचायला जाताना दिसतात. जीवनभर आपल्या घरासाठी झिजलेल्या महिलांना किमान वृद्धापकाळा तरी घरी बसून दोन वेळचे जेवण मिळावे, ही अपेक्षा असते; पण वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तालुक्यातील काही वृद्ध महिलांना जगण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.