शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कल्पवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: March 19, 2017 01:12 IST

शीतल छाया, पक्ष्यांचे आश्रय स्थान, पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करणारे झाड म्हणजे कडूनिंब होय;

जपणूक गरजेची : देशी झाडांवर कुऱ्हाड तर विदेशी वृक्षांचे जतन सेवाग्राम : शीतल छाया, पक्ष्यांचे आश्रय स्थान, पर्यावरण आणि आरोग्याचे रक्षण करणारे झाड म्हणजे कडूनिंब होय; पण मानवाच्या लालसेमुळे या झाडांवर संकट आले आहे. कल्पवृक्ष म्हणून ओळख असणारी ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा, शेत व बांधाच्या काठावर तथा मोकळ्या रानात मोठ्या प्रमाणात कडूनिंबाची झाडे आढळत होती. मानवाला वृक्षाचे महत्त्व आणि कडुनिंबाचे गुणधर्म कळायला लागले. याच वैशिष्ट्यामुळे कडूनिंबाने आयुर्वेदात स्थापन प्राप्त केले. या झाडाच्या पान, फांद्या, साल, खोड एवढेच नव्हे तर झाडाच्या खालची मातीही विविध आजारासाठी उपयोगी पडते. पिवळ्या रंगाची फळे पक्ष्यांसाठी तर बिया, तेल खतांसाठी उपयोगात आणले जाऊ लागले. पर्यावरणात शुद्धता ठेवण्याचे या झाडाचे महत्त्वाचे योगदान असते. विविध कारणासाठी उपयोगी असणारे झाड वाटसरू प्राण्यांसाठी विश्रामांचे स्थान बनले होते. झाडाचे महत्त्व व ऋषीमुनी, संत एवढेच नव्हे तर छत्रपती शिवरायांनीही आपल्या आज्ञापत्रात याचा उल्लेख केलेला आहे. झाडातील आरोग्य वर्धक व उपचारामुळे मानवाने फांद्या, पाने व साल काढायला सुरुवात केली. यामुळे झाडे वाळू लागली. झाडांची साल संरक्षण व अन्न रस पुरवठा करणारी असते. साल काढल्याने पुरवठा थांबतो व झाड वाळते. मानवाच्या अशा कृत्यांमुळेच सेवाग्राम, वर्धा, नागपूर तसेच सेवाग्राम, हमदापूर या मार्गावरील झाडांचे प्रमाण कमी झाले. देशी झाडांवर कुऱ्हाड चालविली आणि विदेशी झाडांचे संवर्धन होताना दिसते. यातूनच कडुनिंबाची कत्तल होत असून झाडे कमी होत आहे. याकडे लक्ष देत कडुनिंबाचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)