शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
3
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
4
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
5
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
6
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
7
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
8
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
9
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
10
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
11
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
12
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
13
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
14
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..
15
विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
16
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
17
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
18
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
19
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
20
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा

आठ कोटी खर्चूनही गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:29 IST

यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.

ठळक मुद्देदोन दिवसाआड पाणीपुरवठा : ग्रामपंचायतीचा नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे दृश्य आहे.८ कोटी ४६ लाख रुपये खर्चून २०११ मध्ये वर्धा नदी येथून काचनगाव, भगवा, सोनेगाव, मनसावळी, पवणी, अलमडोह, अल्लीपूर या सात गावांसाठी जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना करण्यात आली; पण सात वर्षांतही ही योजना पूर्णपणे सक्षम होऊ शकली नाही. परिणामी, अल्लीपूरवासीयांवर ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ओढवली आहे. उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.यशोदा नदीला पाणी आहे. यावर पाणी पुरवठा योजना असल्याने ग्रा.पं. ने पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करणे गरजेचे होते; पण अद्याप मागणी केली नाही. ग्रा.पं. चे नियोजन नसल्याने पाणी समस्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात जि.प. अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. जीवन प्राधिकरण योजनेबाबत यात चर्चा करून उर्वरित कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याची हमी अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिली; पण जीवन प्राधिकरण कुणाचेच ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने पाणी समस्या कायम आहे.अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व गावातील पाईपलाईन, व्हॉल्व्हची कामे २० ते २५ वर्षांपूर्वीची असल्याने नव्याने संपूर्ण पाईपलाईन करणे गरजेचे आहे. याकडे जीवन प्राधिकरण दुुर्लक्ष करीत असल्याची तक्रार ग्रा.पं. ने निवेदनातून केली होती; पण उपयोग झाला नाही. ग्रा.पं. प्रशासन, प्राधिकरण, पाटबंधारे विभाग यांच्या कचाट्यात अल्लीपूरचे ग्रामस्थ भरडले जात असून आता पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भगवा गावात कृत्रिम पाणीटंचाईकानगाव सर्कलमधील चानकी (कोरडे) या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या भगवा या गावात नियोजनाच्या अभावामुळे भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.२०१४ ते २०२० या कालावधीसाठी कानगाव सर्कमधील जि.प. साठी चानकी या गावाची निवड असून पंचायत समिती उपसभापतीही याच गावातून निवडले गेले आहे. या गावांत येत असलेल्या भगवा गावाची लोकसंख्या २०० च्या घरात आहे. या गावातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची ओरड होत आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.ग्रामीण रुग्णालयात कृत्रिम पाणीटंचाईसमुद्रपूर - स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दोन विंधन विहिरी व एक विहीर असून त्यापैकी एक विधन विहीर बंद आहे. २०१६ मध्ये या रुग्णालयात पाणीटंचाई उद्भावली असता मानवीय दृष्टीकोनातून पि.व्ही. टेक्सटाईल्स जाम यांनी ााणी टंचाईचे वृत्त वाचून या रुग्णालयात मे २०१६ मध्ये विंधन विहीर तयार करून दिली होती. त्या बोअरला चांगल्या प्रकारे पाणी लागले. यामुळे एक वर्ष पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर झाली होती; पण १८ महिन्यांपासून या विंधन विहिरीत बिघाड आला असून रुग्णालय प्रशासनाने विंधन विहिरीच्या दुरूस्तीची उपाययोजना केली नाही. शिवाय दुसऱ्या बंद असलेल्या विंधन विहिरीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वर्भे हिंगणघाट येथे राहत असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; पण ग्रामीण भागातून रुग्णालयात येणाºया रुग्णांचे व त्यांच्या नातलगांचे हाल होत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई