शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पाणीटंचाईचे भाजीपाल्यालाही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:04 IST

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी कोमेजतेय पीक : उत्पादक शेतकरी चिंतित; लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. अनेकांकडे सिंचनसुविधा उपलब्ध असली तरी उन्हामुळे पाणीपातळी खालावल्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी भाजीपाला पीक कोमजत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला लागवड केल्यापासीन निघेपर्यंत त्याची काळजी घेत वेळोवेळी पाणी पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. याचाच परिणाम म्हणून भूगर्भातील जलाशयाची पातळी खालावल्याने शेतातील विहिरींनीही तळ गाठल्याचे चित्र आहे. यामुळे भाजीपाला पिकाला ओलित करणे कठीण झाले असून पीक कोमेजून जात आहे. पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघतो की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.भाजीपाला पिकाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकºयांनी पिकाच्या संरक्षणाकरिता शेतीला तारेचे कुंपण घातले आहे. असे असले तरी श्वापदांचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी पीक वाचविण्यासाठी बुजगावण्याचा आधार घेतला आहे.भाववाढीचा शेतकऱ्यांना मात्र लाभ नाहीदरवर्षी उन्हाळ्यात आवक घटत असल्याने भाजीपाल्याचे भाव वधारतात. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे सर्वच ठिकाणी भाजीपाल्याचे पीक संकटात आले आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आवक मंदावली, तर जिल्ह्यातील भाजीपाला पीक सिंचनाअभावी धोक्यात आले. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेत सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. कांदे, बटाटे, टमाटर यांचे भाव वगळता मिरची, वांगी, पत्ताकोबी, फुलकोबी, गवार, कारले, भेंडी, कोथिंबीर, यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीचा शेतकऱ्यांचा मात्र फायदा नाही. यात दलाल मालामाल होत आहे. तर सर्वसामान्यांचे भाजीपाल्याच्या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.नदीपात्राला कोरड; जलसंकटाची चाहूललोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : एप्रिल महिन्यातच तीव्र सूर्यप्रहार होत असल्यामुळे तापमानात कमालीची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. मागील दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अल्प प्रमाणात झाल्यामुळे चिकणी, जामणी, निमगाव, सोनेगाव (आबाजी), पढेगाव व परिसरातील गावांमध्ये जलसंकट गडद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव ही चारही गावे भदाडी नदीतीरावर वसले असून सोनेगाव (आबाजी) यशोदा नदीतीरावर आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे अल्पावधीतच नदीपात्र कोरडे झाले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. हल्ली नदीपात्रात जनावरांना तर सोडा; पण पशुपक्ष्यांना सुद्धा पिण्यास पाणी राहिले नाही. याकरिता जनावरांना तथा पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. यामध्ये कित्येक जनावरे व पशुपक्षी मृत्युमुखी पडत आहेत.जंगलव्याप्त भागात बरेच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. शेतकरी तथा गोपालक या शिवारामध्ये कृत्रिम पाणवठ्याची शासन दरबारी मागणी करीत आहे. चारही गावांच्या नळयोजनेच्या विहिरी भदाडी नदीपात्रात करण्यात आल्या आहेत. परंतु पढेगाव येथील विहिरीच्या पाण्याची पातळी जास्तच खोल गेल्यामुळे येथे एक दिवसाआड नळाला पाणी येते. मागच्यावर्षी पर्यंत पाणी मुबलक मिळत असे; परंतु यावर्षी मात्र नळयोजनेच्या विहिरीला अपुरे पाणी असल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, असे गावकरी सांगतात.