शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

वर्धेच्या तरुणाने रोवला अंटार्क्टिकावर तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 14:43 IST

वर्धा शहरातील रहिवासी व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देसहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई वायू सेनेत भूदल परीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील रहिवासी व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.नवोदयमध्ये शिक्षण घेत असतानाच राकेशची निवड २००५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय वायू सेनेत झाली. तिथे नोकरी करतानाच त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पर्यटन विषयात एम.बी.ए. केले. सध्या तो वायू सेनेत भूदल परीक्षक या पदावर कार्यरत आहे. भारतीय वायू सेनेमार्फत त्याने हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मिरमधील हिमालयाच्या सहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. हे ध्येय पूर्ण करीत असतानाच त्याला मिशन अंटार्क्टिकाची संधी चालून आली. हजारो वायू सैनिकांमधून भारतीय वायू सेनेने मिशनसाठी पाच सैनिकांची निवड केली. त्यामध्ये राकेशचा समावेश होता.अंटार्क्टिका खंडातील सर्वाच उंच शिखर माऊंट विन्सन पादाक्रांत करण्यासाठी राकेशसह पाच सदस्यांची चमू १२ डिसेंबर २०१७ ला रवाना झाली. १६ डिसेंबर २०१७ ला चमू चिलीया देशात पोहोचली. चिलीच्या भारतीय राजदूत अनिता नायर यांनी १९ डिसेंबरला चमूला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ७ हजार ७५७ मीटर उंचावर, उणे ३० ते ५० डिग्री तापमानात हाडे गोठवणाऱ्या थंडीत चोवीस तास प्रकाशात ४० ते ५० कि़मी. वेगाने वाहणाऱ्या बर्फाच्या वादळात ४० किलो वजनाचे सामान पाठीवर बांधून रोज ९ तास अनेक अडथळे पार करीत २६ डिसेंबरला ही चमू अंटार्क्टिकाच्या सर्वात उंच शिखरावर पोचली आणि भारताचा तिरंगा व वायू सेनेचा झेंडा तिथे फडकविला.मिशन पूर्ण करून ११ जानेवारीला चमू वायूसेना मुख्यालयात दाखल झाली. तेथे वायूसेना अध्यक्षांनी चमूला प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानित केले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल