शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेचे पाणीसंकलन मॉड्युल पंतप्रधान आवास योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 17:26 IST

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान तारांकीत प्रश्नाद्वारे त्यांच्या पाणी संकलनाच्या मॉड्युलचे प्रात्याक्षिक दिले होते. या मॉड्युलचा अभ्यास करीत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे करून अहवाल सादर केला. या अहवालात सदर मॉड्युल पाऊस पाणी संकलनाकरिता महत्त्वाचे सिद्ध झाल्याने त्याचा उपयोग पंतप्रधान आवास योजनेत होणार आहे.वैद्यकीय ...

ठळक मुद्देपाऊस पाणी संकलनाकरिता उपयुक्त राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवालवापर करणाºयांना मालमत्ता करात सवलत देशातील एकमेव यंत्र

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान तारांकीत प्रश्नाद्वारे त्यांच्या पाणी संकलनाच्या मॉड्युलचे प्रात्याक्षिक दिले होते. या मॉड्युलचा अभ्यास करीत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्व्हे करून अहवाल सादर केला. या अहवालात सदर मॉड्युल पाऊस पाणी संकलनाकरिता महत्त्वाचे सिद्ध झाल्याने त्याचा उपयोग पंतप्रधान आवास योजनेत होणार आहे.वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे यांनी सादर केलेल्या या मॉड्युलच्या उपयुक्ततेचा सर्व्हे करण्याच्या सूचना राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार विभागाने केलेल्या सर्व्हेत वर्धेचे मॉड्युल घराच्या छतावर जमा होणाºया पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता यशस्वी ठरले. तसा अहवाल भूजल विभागाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयाला दिला. या अहवालावरून मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी या यंत्राचा वापर शासकीय करण्याच्या सूचना एका पत्राद्वारे नगरविकास विभागाला दिल्या आहेत.या यंत्राच्या सहायाने केवळ छतावरील पाणीच जमिनीत मुरविणे नाही तर त्याची साठवण करून त्याचा वापर पिण्याकरिता उपयोगात आणणे सहज शक्य होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे वर्धेचे हे मॉड्युल उपयोगात आणल्यास मुख्यत्वे दुष्काळग्रस्त भागात लाखमोलाचे ठरेल व दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांच्या सचिवाने पत्रात उल्लेखित केले आहे.वापर करणाºयांना मालमत्ता करात सवलतच्पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या घरकुलांच्या कामात या यंत्राचा वापर करण्याचे सुचविले आहे. यंत्र वापरणाºया ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिकांना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे.छतावर साचणारे पावसाचे पाणी थेट विहिरीत किंवा बोअरमध्ये सोडणे शक्य आहे. या यंत्राच्या माध्यमातून पाण्याचा शंभर टक्के रिचार्ज शक्य आहे. असे यंत्र कोणी तयार करून नये म्हणून व्हीजेएमने त्याचे पेंटट ठेवले आहे. विशेष म्हणजे शासनाने पाऊस पाण्याच्या संकलनाकरिता निर्देषित केलेले हे देशातील एकमेव यंत्र आहे.- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष, वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा.