शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

२४ वर्षांपासून ग्रामस्थांना पुनर्वसनाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 6, 2014 23:58 IST

२४ वर्षांपूर्वी साहूर येथील मंजुळा (जाम) नदीला आलेल्या महापुरात ३६ पूरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे

वर्धा : २४ वर्षांपूर्वी साहूर येथील मंजुळा (जाम) नदीला आलेल्या महापुरात ३६ पूरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे साहूरला आले होते. त्यानंतर आजवर अनेक निवेदने, अधिकाऱ्यांच्या भेटी, तीव्र आंदोलने करण्यात आली. परंतु २४ वर्षे लोटूनही येथील नागरिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना हक्काची घरे देण्याची मागणी मानव जोडो संघटनेच्यावीतने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आतापर्यंत आलेल्या पुरांमुळे गावेच्या गावे वाहून गेली आहेत. या पूरग्रस्तांना सुधारित पद्धतीची घरे बांधून देऊन तसेच आर्र्थिक मदत देऊन शासनाने त्यांचे पुनर्वसन केले. अशाच प्रकारचा पूर २४ वर्षांपूर्वी साहूर येथील मंजुषा(जाम) नदीला आला होता. या पुरात येथील ३६ नागरिकांची घरे पूर्णत: वाहून गेली. यात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद प्रवार यांनीही सदर स्थळाला भेट दिली आणि लवकरच ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २४ वर्षी लोटूनही त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकारी पूरग्रस्तांसाठी नाल्या, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत भवन, कोंडवाडा बांधून दिल्याचे सांगतात. त्यामुळे आता कोंडवाड्यात, शाळेत वा ग्रामपंचायत भवनात पूरग्रस्तांनी राहायला जावे का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. आजवर पूरग्रस्तांनी आपल्याला घरासाठी हक्काचे भूखंड मिळावे म्हणून अनेक निवेदने दिली तसेच संबधित अधिकारी वर्गाला प्रत्यक्ष भेटून भूखंड देण्याची मागणी केली. परंतु प्रत्यक्षात मात्र भूखंडाचे पट्टे देण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना भूखंडाचे योग्य पट्टे देण्यात यावे व घरे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना २ लाख रुपये व भूमिहीनांना १ लाख ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी किंवा प्रत्येकांना सुधारित घरकुले बांधून द्यावी, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस रमेशचंद्र सरोदे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १ सप्टेंबरनंतर आंदोलन करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदनाच्या प्रति प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पुनर्वसनमंत्री, पालकमंत्री, खासदार यांना पाठविल्या आहेत.(शहर प्रतिनिधी)