शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 17, 2017 01:10 IST

कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे.

आदिवासी शेतकरी मारतोय विद्युत कार्यालयाच्या चकरावर्धा : कर्ज न घेता स्व-कष्टाने खोदलेल्या विहिरीवरील पंपाला वीज जोडणी देण्यास तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे. यामुळे वडदचे आदिवासी शेतकरी माणिक राजाराम गेडाम यांची कोंडी झाली आहे. याकडे लक्ष देत वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.शेतकरी गेडाम यांनी ‘डिमांड नोट’नुसार वीज जोडणी मिळावी म्हणून देवळीच्या विद्युत कार्यालयाकडे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी रकमेचा भरणा केला. त्यांच्या मालकीचे वडद शिवारात सर्व्हे क्र. २७९/१ मध्ये १ हेक्टर ०८ शेत आहे. त्यांनी २०११ आणि २०१२ या दोन वर्षात स्व-कष्टाने शेतात विहीर खोदली. सुमारे १७ फुट गोटा फोडून त्यांनी ही विहीर केली. यानंतर विहिरीवर मोटारपंप बसविण्यासाठी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला. विद्युत कंपनीने त्यांना ५ हजार १०० रुपयांची डिमांडनोट दिली. त्यांनी ही रक्कम भरली; पण त्यांना वीज जोडणी अद्यापही देण्यात आली नाही. विविध कारणे सांगून दोन वर्षांपासून जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार फेऱ्या मारून गेडाम त्रस्त झाले आहेत. शेतातील काम बंद ठेवून त्यांना वीज जोडणी कधी मिळेल, हे विचारण्याकरिता विद्युत कार्यालयात जावे लागते; पण चकरा संपत नाही. वीज जोडणी न मिळाल्याने ५०० रुपये दररोजप्रमाणे खर्च करून त्यांना डिझेल पंपाद्वारे शेतात ओलीत करावे लागत आहे; पण हा खर्च त्यांना शक्य नाही. वीज जोडणी न मिळाल्याने या शेतकऱ्याला शेतात दोन पिके घेता येत नाही. याकडे लक्ष देत त्वरित वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)