शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

चार वर्षांपासून न्यायालयाच्या इमारतीला न्यायाची प्रतीक्षा

By admin | Updated: November 17, 2016 00:43 IST

न्यायदानाचे कामकाज चालविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाने तालुका ठिकाणी स्वतंत्र हक्काची

जागा मंजूर, प्रस्ताव प्रलंबित : निधीअभावी भाड्याच्या घरातून कारभारअमोल सोटे आष्टी (श.)न्यायदानाचे कामकाज चालविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाने तालुका ठिकाणी स्वतंत्र हक्काची न्यायालय इमारत उभारण्याचे धोरण अवलंबिले आहे; पण शहीदभूमी आष्टीला १९८४ मध्ये तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊनही न्यायालयाच्या इमारतीपासून वंचित राहावे लागले. चार वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या मागील जागा मंजूर झाली; पण निधीच मिळाला नाही. यामुळे पूढील काम रखडले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा गरजेचा आहे.आष्टी नगरपंचायत व तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी होणाऱ्या सर्व घटना, शेतीसंबंधी, मकान, जागा, अनेक प्रकारचे वादविवाद, धनोदश अनादर प्रकरणे, संपत्तीची प्रकरणे यासाठी नागरिकांना न्यायालयाची पायरी गाठावी लागते. न्यायदानाची प्रक्रिया खुप वेळखाऊ असल्याने अनेक खटले वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक तारखेवर नागरिक तालुक्याला येतात. येथे सध्या भाड्याच्या इमारतीत न्यायदानाचे काम सुरू आहे. नवीन इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला; अधिक निधी लागत असल्याने तो परत आला. यात काही सुधारणा करून नव्याने प्रस्ताव पाठविण्यात; पण त्यावर अद्याप निधी मंजुरीची मोहर उमटली नाही. निधीअभावी बांधकाम निवीदा प्रक्रियाही शक्य नाही.बसस्थानकाच्या मागे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. सध्या कचरा टाकण्यासाठी या जागेचा वापर केला जातो. या गाजेवर न्यायालयाची राखीव जागा म्हणून फलक लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात बांधकाम सुरू होण्यास किती कालावधी लागेल, याची निश्चित माहिती कुणीही सांगू शकत नाही. न्यायालयाच्या इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता विवेक पेंढे यांनी तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रस्तावाची माहिती जाणून घेतली. यात पूर्वी २ बेंचसाठी प्रस्ताव पाठविला होता. यावर न्यायालयाने आष्टी न्यायालयात अधिक केसेस नाही म्हणून १ बेंच एवढ्याच डिझाइनचा प्रस्ताव देण्यात आला. याला बांधकाम कारण्यासाठी एकूण १३ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सुधारीत बांधकामाचे ड्रार्इंगही देण्यात आले आहे. चार वर्षांपासून प्रलंबित मंजुरीचे काम उपविभागीय अभियंता पेंढे यांच्यामुळे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. साधारणत: एक वर्ष लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. न्यायाधीश निवासासाठी ५० लाखन्यायाधीश क्वॉर्टरकरिता शासनाने ५० लाख रुपये मंजूर केले. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार आहे. शासकीय इमारत झाल्यावर भाड्यात बचत होते. शिवाय सुसज्ज वास्तूतून कारभार चालविणे सुलभ होते. आष्टी शहराच्या विकासात शासकीय इमारतींचा मोठा वाटा आहे. शासनाने पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, भूमी अभिलेख, तहसील, आयटीआय, वसतिगृह या इमारतींचे बांधकाम पूर्ण केल्याने शहराला नवीन रूप प्राप्त झाले. न्यायालयाची इमारत, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वनविभाग, सामाजिक वनीकरण, नगर पंचायत, पोलीस ठाणे या इमारती मंजूर होणे गरजेचे झाले आहे. बसस्थानकाला लागून असलेली सर्व्हे क्र. ७३० ही जागा दिवाणी व फौजदारी न्यायालय आष्टीसाठी मंजूर आहे. एक बेंचकरिता नवीन प्रस्ताव सुधारीत ड्रॉर्इंग काढून पाठविला. मंजुरीनंतर काम सुरू होईल.- विवेक पेंढे, उपविभागीय अधियंता, सा.बां. उपविभाग, आष्टी (श.).आष्टी हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे दिवाणी फौजदारी न्यायालय आहे. शासनाने न्यायालयाची इमारत लवकर मंजूर करून बांधकाम केल्यास नागरिकांच्या हिताचे ठरेल. शासकीय कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल.- अ‍ॅड. जयंत जाणे, विधीतज्ज्ञ, आष्टी (श.).