शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर-हिंगणघाट इंटरसिटी एक्सप्रेसकरिता प्रतीक्षाच

By admin | Updated: December 28, 2016 00:43 IST

चंद्रपुर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

हिंगणघाट : चंद्रपुर-हिंगणघाट-नागपूर या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जलद गाड्यांना या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हिंगणघाट, वरोरा, भद्रावती येथील प्रवाशांना नागपूर किंवा वर्धा येथे जाण्याकरिता मोजक्याच गाड्या असल्याने त्यांची तारांबळ उडते. अनेक वर्षापासून इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बल्लारशाह, वर्धा, नागपूर या शहरादरम्यान इंटरसिटी चेअर कार ट्रेन सुरू करावी अशीही मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. या गाडीची सोय उपलब्ध झाल्यास पासधारक प्रवासी तसेच विद्यार्थी व व्यापारीवर्गाला मोठा दिलासा मिळेल. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे नागपूर ते चंद्रपूर दरम्यान ये-जा करणाऱ्यांना सुविधा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या अधिक असल्या तरी काही गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची ताटकळ होते. त्यामुळे अनेकजण बसगाडीने जाणे पसंत करतात. इंटरसिटी एक्सप्रेसमुळे हे प्रवासी रेल्वेकडे वळण्याची शक्यता आहे. बल्लारशाह, चंद्रपुर, वरोरा, हिंगणघाट, वर्धा येथून कार्यालयीन कामकाजाकरिता, शिक्षणाकरिता तसेच व्यावसायिक कारणांनी दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. याशिवाय वर्धा किंवा नागपूर येथून पुढे रेल्वे प्रवास करण्याकरिता जाणारे प्रवासी असतात. त्यांना या रेल्वेगाडीमुळे आधार होईल. चंद्रपूर ते नागपूर दरम्यान इंटरसिटीसारख्या रेल्वेगाड्या सुरू केल्यास प्रवाशांना गंतव्य स्थळी वेळेवर पोहचण्यास मदत होईल. प्रवाशांच्या त्रास कमी होईल. शिवाय प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होऊन रेल्वे प्रशासनाला आर्थिक नफा होईल. रेल्वेने प्रवास करणे कमी खर्चाचे असल्याने प्रवाशांच्या खिशावरील ताण कमी होऊ शकतो.(स्थानिक प्रतिनिधी) इंटरसिटी गाडीमुळे प्रवाशांच्या वेळेची होईल बचत बल्लारशाह, चंद्रपुर, हिंगणघाट या भागातील प्रवाशांना अमरावती, मुंबईकडे तसेच नागपूर, दिल्ली, कोलकाता या मार्गावर प्रवास करायचा असल्यास वर्धा किंवा नागपूर येथून गाड्या बदलवाव्या लागतात. इंटरसिटी गाडी सुरू केल्यास सुविधा होईल. या भागातील प्रवाशांकरिता रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने त्यांची बराच वेळ ताटकळ होते. अमरावती किंवा हावडा मार्गावरील गाडी घ्यायची असल्यास बराच वेळ घरुन निघुन गाडी पकडावी लागते. प्रवाशांची यात ताटकळ होते.