शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मतदार नोंदणी अभियानाला सुरूवात

By admin | Updated: June 19, 2014 00:13 IST

मतदार यादीत नाव नोंदविण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली असून, मतदार यादीत नाव नसलेल्या तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना

वर्धा : मतदार यादीत नाव नोंदविण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली असून, मतदार यादीत नाव नसलेल्या तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम सुरु असून, जवळच्या मतदान सहायता केंद्रात मतदान नोंदणीचे फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहे.यात छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून, मतदारांनी या विशेष मोहिमेमध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार मदत केंद्रावर सादर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांंनी नागरिकांना केले आहे. मतदार यादीतून आपले वगळले गेले असल्यास अथवा नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमूना क्रमांक ६ मध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील नाव नोंदणी संदर्भात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी नमुना क्रमांक ७ तसेच मतदार यादीतील तपशिलामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास अथवा विधानसभा मतदार संघाअंतर्गत पत्ता बदलायचा असल्यास नमुना ८ अ भरणे आवश्यक आहे. मतदार यादीतून आपले नाव वगळले गेले असल्यास किंवा मतदार यादी पाहण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयात मतदार यादी उपलब्ध आहे. नवीन मतदार नोंदणीसाठीचे विहित नमून्यातील अर्ज मतदार मदत केंद्रावर उपलब्ध असून, याच केद्रावर अर्ज स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. छायाचित्र मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. १ जानेवारी २०१४ रोजी १८ वर्षे पुर्ण केलेल्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यचे आवाहन केले आहे.(शहर प्रतिनिधी)