शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

गावांमध्ये उघड्यावर हागणदारीचे चित्र कायमच

By admin | Updated: December 22, 2014 22:52 IST

ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्याने

वर्धा : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा म्हणून शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्याने गावात शौचालयाची संख्या वाढली आहे; परंतु या शौचालयाचा वापर नगण्य होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात ५० टक्यापेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौच्छविधी करीत असल्याने उघड्यावरील हागणदारी कायम असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्र्रामस्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामूदायिक आणि वैद्यकीय स्वच्छतेतून ग्र्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने २००४ पासून संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले. त्यांच्या अभूतपूर्व यशानंतर केंद्र शासनाने सन २००५ पासून संपूर्ण देशात निर्मलग्राम योजना सुरू केली. २००५ मध्ये शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत होते. निर्मल ग्राम अभियानाची व्याप्ती सन २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहीत करण्यात आले. २००८ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रापंचायातींना निर्मलग्राम योजनेचा पुरस्कार देखील मिळाला. तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी काही प्रमाणात कमी देखील झाली होती. २००९ ते २०१२ या कालावधीत शौचालयाला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाल्याने लोकांनी शासकीय अनुदान मिळते म्हणून मोठ्या प्रमाणात शौचालय बांधली गेली; परंतु ग्रामीण भागामध्ये या शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. घरी शौचालय असताना देखील बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्याने जिल्हा तसेच तालुक्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाही. त्यामुळे बहुतेक ग्रामपंचायतीत उघड्यावरील हागणदारी सर्रास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)