कामे प्रलंबित : समस्यात वाढ; नागरिकांची ससेहोलपटसमुद्रपूर : तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने विविध मागण्याकरिता बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा फटका नागरिकांंना सहन करावा लागत असून दाखले, शालेय विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, विकासाची कामे, घरकुलाचे दाखले आदी कामे खोळंबली आहे. संघटनेच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक उपस्थित नसतात. त्यामुळे विकासकामांच्या कंत्राटदारांचे देयके प्रलंबित पडली असून तालुक्यातील अनेक गावातील विकास कामे ठप्प आहेत. पाणीपुरवठ्याची वीज देयके न भरल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता असून नगरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. संबंधीत अधिकाऱ्यांनी नागरिकांना होत असलेल्या असुविधेकरिता या समस्येवर त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवकांच्या आंदोलनाने ग्रामस्थ त्रस्त
By admin | Updated: July 5, 2014 23:44 IST