शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

शासकीय रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर ठरताहेत शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड बाधित होते. तर व्हेंटिलेटर रुग्ण खाटा रिकाम्या असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देव्हेंटिलेटर बेडस् रिकामेच : वर्धा, हिंगणघाट अन् आर्वी येथील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे व्हेंटिलेटर आहे. परंतु, या तिन्ही शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर सध्याच्या कोरोना संकटाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या काळात शोभेची वस्तू ठरत आहे. वर्धा शेजारील जिल्ह्यात व्हेंटिलेटर रुग्ण खाटांचा तुटवडा निर्माण झाला असताना या तिन्ही रुग्णालयातील व्हेंटिलेअरवर सध्या एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच अधिग्रहित केलेल्या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर मिळेना तर गावांत त्यावरील धूळ निघेना असे चित्र बघावयास मिळत आहे.रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड बाधित होते. तर व्हेंटिलेटर रुग्ण खाटा रिकाम्या असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल सहा व्हेंटिलेटर आहेत. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात चार व्हेंटिलेटर असून रविवारी व्हेंटिलेअर रुग्ण खाटा रिकाम्या होत्या. तर आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एक व्हेंटिलेटर असून ही व्हेंटिलेटर रुग्ण खाट रिकामी होती, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात तब्बल १९ रुग्ण व्हेंटिलेटर आणि एनआयव्ही मोड ऑफ व्हेंटिलेटरवर तर सेवाग्राम येथील रुग्णालयात सुमारे दहाहून अधिक रुग्ण व्हेंटिलेटर आणि एनआयव्ही मोड ऑफ व्हेंटिलेटरवर  असल्याचे सांगण्यात आले. 

असे केले जाऊ शकते  प्रभावी नियोजनजिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक विशिष्ट कक्षाची निर्मिती करून अकराही व्हेंटिलेटर तेथे लावून कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाऊ शकते.

या विशिष्ट कक्षात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी काही तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करता येऊ शकते.

ही पर्यायी व्यवस्था उभी झाल्यावर अधिग्रहित केलेल्या दोन्ही कोविड रुग्णालयांवरील कामाचा ताण थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो. शिवाय शासकीय आरोग्य यंत्रणाही मजबूत होऊ शकते. 

वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात चार तर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात एक व्हेंटिलेटर आहे. या व्हेंटिलेटरचा वेळप्रसंगी तसेच आवश्यक त्या वेळी वापर केला जातो.- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल