शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करा

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली

वर्धा : शेतकऱ्याच्या कृषीपंपाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपली. वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनातून केली असता शेतकऱ्याला अपमानास्पद वागणुक मिळाली. शिवाय खंडित केलेला वीजप्रवाह पूर्ववत न केल्याने निकसान सहन करावे लागले. या प्रकरणाची चौकशी करुन कृषीपंपाचा वीजप्रवाह पूर्ववत करण्याची मागणी निवेदनातून देवळी येथील अभियंत्या यांच्याकडे शेतकरी अब्दूल रशीद हबिबउल्लाह खान यांनी केली आहे.निवेदनानुसार, अर्जदार खान यांची शेती मौजा अडेगाव येथे आहे. त्यांच्या शेतात दोन विहिरी असून सदर विहिरींवर विद्युत मिटर बसविण्यात आहे़ त्याचा ग्राहक क्रमांक अनुक्रमे ३९२२४०००३०४५ आणि ३९२२४७०००३८६ असा आहे़ या मिटरला नजीकचे शेतकरी नाकट व देवराव वैद्य यांच्या शेतातील डि़पी़ वरून विद्युत प्रवाहाची जोडणी केलेली आहे़ नाकट यांच्या शेतातील डि.पी जवळील विहिर उपसन्याचे काम सुरू आहे़ खान यांनी शेतात भाजीपाला व पराटीची पिके आहेत. अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. विहिरीवर पंप आहे पण विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यातच लगतच्या शेतातील शेतकऱ्यांकडून पाणी पुरवठा करणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने पाण्याअभावी पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. तसेच शेतात धुळ पेरणी केली असल्याने शेतकऱ्यास विद्युत प्रवाहाची आवश्यकता आहे़ अर्जदार शेतकऱ्याने नियमीत विद्युत देयकाचा भरणा केला आहे. यामुळे कोणतेच देयक शिल्लक नसताना या ग्राहकाला वीज वितरण कंपनीकडून नाहक त्रास दिला जात आहे. मागील काही दिवसांपासून सदर डि़पी़ वरून दोन्ही विहिरींवरील विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे. याचे काहीच कारण दिले जात नसल्याने संभ्रम आहे. तसेच पोलवरून वीज तारा शॉट असल्याने हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची मागणी आहे. याची तक्रार नोंद नसल्याने हा बिघाड कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)