शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन प्रकरणात जि.प.अधिकाऱ्यांची माहिती आयोगासमोर सुनावणी

By admin | Updated: September 18, 2016 00:48 IST

शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीचा मुद्दा सध्या विविध प्रकरणातून समोर येत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह काही

११ ग्रामपंचायतीतील प्रकरण : अधिकाऱ्यांना दिली आयोगाला उत्तरेवर्धा : शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचायतीचा मुद्दा सध्या विविध प्रकरणातून समोर येत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह काही ग्रामविकास अधिकाऱ्यांची नागपूर येथे माहिती आयुक्तांसमोर सुनावणी झाली. दोनही प्रकरणात माहिती आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पुरावेही सादर केले. यात सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी काढण्याच्या सूचना माहिती आयुक्तांनी दिल्याचे प्रमोद मुरारका यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. पहिली सुनावणी जिल्हाधिकारी यांच्या सदर्भात होती. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जन माहिती अधिकारी व कार्यालय अधीक्षक प्रमोद कदम यांच्यासह कर्मचारी काटपाईले उपस्थित होते. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला केलेला पत्रव्यवहार या बाबात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान जिल्हा परिषद वर्धाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार हजर होते. यावेळी माहिती आयोगाने या प्रकरणाचा संबंध जिल्हा परिषदेशी असल्याने त्यांनी तक्रारींचा ठरावीक वेळेत निपटारा करावा व केलेल्या कार्यवाहीची माहिती या कार्यालयाला द्यावी, असे आदेश वजा निर्देश दिले. दुसरी सुनावणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची असल्याने या सुनावणीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे व जन माहिती अधिकारी देवढे यांची उपस्थिती होती.अधिकाऱ्यांनी मांडली बाजूवर्धा : सुनावणी दरम्यान अपिलार्थीने आपली बाजू प्रभावीपणे मांडली व ती माहिती आयोगाला लक्षात आल्याने आयोगाने अपिलार्थी यांच्या प्रकरणात तातडीने चौकशी समिती नेमावी व त्याचा ठराविक मुदतीत अहवाल मागून त्यावर नियमानुसार कार्यवाही करावी व त्याबाबतचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. वर्धा यांनी २७ सप्टेंबर २०१६ पर्यंत द्यावी. तसेच त्याची प्रत माहिती आयोग कार्यालयात देण्यात यावी, असे आदेश दिले. या सुनावणी दरम्यान माहिती आयोगासमोर उप विभागीय कार्यालयातर्फे नायब तहसीलदार महाजन, गट विकास कार्यालयातर्फे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रज्ञा माने, आरोग्य पर्यवेक्षक हाते, जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक काटपायले, ११ ग्रा.पं.पैकी पिपरीचे ग्रामसेवक कैलास बर्धिया उपस्थिती होते.(प्रतिनिधी)