शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विजय जळीतप्रकरणी दोघा भावंडाना दहा वर्षे कारावास

By admin | Updated: December 20, 2014 01:55 IST

वायगाव (निपाणी) येथे घरगुती वादातून अंगावर रॉकेल टाकत विजय ढोबळे याला जिवंत जाळल्याप्रकरणी प्रल्हाद रामभाऊ ढोबळे व दिवाकर रामभाऊ ढोबळे ...

वर्धा : वायगाव (निपाणी) येथे घरगुती वादातून अंगावर रॉकेल टाकत विजय ढोबळे याला जिवंत जाळल्याप्रकरणी प्रल्हाद रामभाऊ ढोबळे व दिवाकर रामभाऊ ढोबळे या दोघा भावंडाना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी दिला. या दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि प्रत्येकी १० हजार रुपये मृतकाची पत्नी कविता विजय ढोबळे हिला कॅम्पेंसेशन देण्याचा आदेश दिला.घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, दोन्ही प्रल्हाद व दिवाकर तसेच त्यांची आई बेबीबाई हे तिघे वेगळे राहत होते. विजय ढोबळे हा त्याच्या पत्नीसह वायगाव (नि.) येथे वास्तव्यास होते. १३ एप्रिल २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता विजयने त्याची आई बेबीबाईला विजेचे बिल भरल्यानंतर वीजपुरवठा देण्याची मागणी केली. यावरून तिने विजयला शिवीगाळ केली. नंतर प्रल्हाद आणि दिवाकर यांनी काठीने विजय व त्याची पत्नी कविताला मारहाण केली. यावेळी दिवाकरने विजयचे दोन्ही हात पकडून ठेवले व प्रल्हादने विजयच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला पेटविले. विजयच्या पत्नीने वायगाव पोलीस चौकीत तक्रार केली असता पोलिसांनी त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करून त्याचे मृत्यूपूर्व बयान नोंदवले. या बयानावरून देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.५९/१३ अंतर्गत भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास करून प्रकरण न्यायप्रवीष्ट केले. न्यायालयाने साक्षपुराव्याच्या आधाराने उपरोक्त निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. अनुराधा सबाने यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)