शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाखांवर दारूसाठा जप्त

By admin | Updated: June 21, 2014 01:56 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरूवारी पहाटे एकुर्ला फाटा अल्लीपूर ...

वर्धा : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुरूवारी पहाटे एकुर्ला फाटा अल्लीपूर येथे नाकाबंदी केली़ यात ३ लाख ५९ हजार रुपयांचा दारूसाठा व कार जप्त करण्यात आली़ या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आणला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली़ एकुर्ला फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, एम़एच़ ४९ डी़ १३१९ क्रमांकाची कार अडविण्याचा प्रयत्न केला; पण ही कार भरधाव पूढे निघाल्याने पोलिसांनी पाठलाग केला. काही अंतरावर कार अडविण्यात पोलिसांना यश आले. या कारची झडती घेतली असता डिप्लोमॅट कंपनीच्या ९० एमएलच्या २ हजार ४८० शिशा किंमत २ लाख ४८ हजार रुपये, डिप्लोमॅट कंपनीच्या १८० एमएलच्या ४६ शिशा किंमत ९० हजार रुपये, बियरच्या ९६ शिशा किंमत १९ हजार २०० रुपये असा मोठा दारूसाठा आढळून आला. दारूची वाहतूक करण्यात आलेली कार किंमत ६ लाख रुपये जप्त करण्यात आली. कार चालक प्रशांत तानबाजी चंदनखेडे (२९) रा. अल्लीपूर यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले़ जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक टी. गेडाम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.टी. चाटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक, संजय गायकवाड, मनोज नांदुरकर, किशोर आप्तुरकर, अजय रिठे, आत्माराम भोयर यांनी ही कारवाई पार पाडली़(कार्यालय प्रतिनिधी)