शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल सीट, तर लायसन्स निलंबित;नवीन कायदे लागू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 05:00 IST

 शहरात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेतही तिपटीने वाढ केली असून, दंड न भरल्यास थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात वाहतूककोंडी नित्याचीच झाली असून, बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, आता वाहतूक पोलीस विभागाने दंडाचे नवीन कायदे लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार दुचाकीवर ट्रिपलसीट दिसल्यास थेट लायसन्स निलंबित होणार असून, सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनो, सावधान राहून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहरात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेतही तिपटीने वाढ केली असून, दंड न भरल्यास थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. 

दंड वाढला, तरी मानसिकता ‘जैसे थे’गृह परिवहन विभाग मुंबई यांनी जारी केलेल्या नव्या वाहतूक दंडाच्या आदेशाने दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या बेशिस्तांना चांगलेच महागात पडणार आहे. मात्र, तरी देखील शहरात अजूनही बेशिस्त चालक दिसून येत आहेत. ही गंभीर बाब आहे.

सोमवारपासून अंमलबजावणी सुरू -   वाहतूक नियमांच्या नव्या दंडाचे आदेश सोमवारी वाहतूक विभागाला दिले असून, त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू झालेली आहे. मात्र, नो-पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्यास आता चलान दिली जाणार नसून त्याच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, धोकादायक वाहन चालविणे अशांवर न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.

वाहतुक नियमांचे नव्या नियमानुसार दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आता आवश्यक राहणार आहे. अन्यथा मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.- धनाजी जळक, वाहतूक पोलीस निरीक्षक.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस