शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरून दोन विभागांत ‘द्वंद्व’

By admin | Updated: June 2, 2017 02:10 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने उचलून धरला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी

तोडगा निघेना : एकमेकांकडे अंगुलीनिर्देशलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा एससी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने उचलून धरला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी २३ ते २५ मे दरम्यान साखळी उपोषणही केले. यामुळे हादरलेले प्रशासन कामी लागले आहे. असे असले तरी जिल्हा परिषद आणि आदिवासी प्रकल्प विभाग यांच्यातच द्वंद्व सुरू झाले आहे. उपोषणादरम्यान दोन वेळा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली; पण जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरण जिल्हा परिषदेकडे ढकलले आहे. आदिवासी आयोगाच्या सदस्या माया ईवनाथे यांच्यासमक्ष जिल्हाधिकारी व शिक्षण हक्क परिषदेमध्ये १२ एप्रिल रोजी चर्चा झाली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा निपटारा १ मे पर्यंत लावा, असे निर्देश सहायक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, शिक्षणाधिकारी जि.प. वर्धा उपमुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. वर्धा यांना दिले होते; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही सदर अधिकारी जुमानले नाही. सदर प्रकरण संवैधानिक अधिकारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे, आदिवासी विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक छळ करणे तसेच अधिकाऱ्यांमार्फत दप्तर दिरंगाई करणे या प्रकारात येत असल्याने अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना वेळीच न्याय मिळाला नाही तर जि.प. कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते आमरण उपोषण करतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष मारोती उईके यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम जिल्हा परिषदेकडे देण्यात आली असली तरी आदिवासी प्रकल्प विभागाने यादी दिली नसल्याचे सांगतात. दोन्ही विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत असल्याने शिष्यवृत्तीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.