शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

सालोड (हिरापूर) येथे होणार ‘ट्रान्सपोर्ट हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:40 IST

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : गुड्स गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वाहन मालकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला व त्यांच्या घरालगत उभी केली जातात. यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सालोड (हिरापूर) येथे ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परवाना देण्याकरिता आणि ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी मागविला प्रस्ताव : चालकांसह वाहकांना विश्रांतीसाठी निवाऱ्याची व्यवस्था

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : गुड्स गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वाहन मालकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला व त्यांच्या घरालगत उभी केली जातात. यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सालोड (हिरापूर) येथे ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परवाना देण्याकरिता आणि वाहने तपासणी करण्याकरिता एक केंद्र आहे. विस्तारित जागेत असलेल्या या केंद्राच्या इमारतीसह इतर बाबींना सध्या ‘ब्रेक’ लागला आहे. या केंद्रालगत शासनाची मोठी जागा असून सदर जागेवर ‘ट्रान्सपोर्ट हब’ निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिल्या आहेत. तत्सम प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडून हा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे येणार आहे. येथून मंजुरी मिळाल्यानंतरच या ‘ट्रान्सपोर्ट हब’चा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मंजूर झालेल्या हा ट्रान्सपोर्ट हब सुमारे पाच एकर जागेत विस्तारला जाणार आहे. येथे वाहनांच्या पार्किंगसह त्यांची दुरूस्ती, लोडींग-अनलोडींग करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या ट्रान्सपोर्ट हबमध्ये वाहनांचे चालक आणि वाहकांकरिता निवाºयाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.सध्या हा ट्रान्सपोर्ट हब कागदावर प्रस्तावित असून त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा अनेकांना लागलेली आहे. असा हब तयार झाल्यास वर्धेतील वाहतुकीची समस्या बºयापैकी मार्गी लागणार आहेत. शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारे अपघातही यातून टळण्याची शक्यता आहे. या ट्रान्सपोर्ट हबमुळे वर्धेला नवीन ओळख लाभणार आहे.पाच एकराच्या जागेवर होणार निर्माणशहरालगत असलेल्या सालोड (हिरापूर) येथे तब्बल पाच एकराच्या विस्तीर्ण आवारात या ट्रान्सपोर्ट हबचे काम होणार आहे. या जागेत वाहनांचे पार्किंग, त्यांची दुरूस्ती आणि चालक व वाहकांसाठी विश्रांतीची सोय येथे करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या जागेवर निर्माण होणाºया या ट्रान्सपोर्ट हबमुळे बºयाच समस्या मार्गी लागतील, असे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेकडे राहणार देखभाल दुरूस्तीज्या जागेवर हा ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्यात येणार आहे. ती जागा जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात येणार आहे. यामुळे येथे उभ्या राहणार असलेल्या इमारतीची आणि देण्यात येणार असलेल्या सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे.