शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पारोधीत पाणी पेटले

By admin | Updated: March 4, 2017 00:36 IST

उन्हाळा येताच पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. याचे चटके तालुक्यातील पारोधी गावातील नागरिकांना बसत आहे.

महिलांची तहसीलला धडक : हातपंपांवरील अतिक्रमण काढा समुद्रपूर : उन्हाळा येताच पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. याचे चटके तालुक्यातील पारोधी गावातील नागरिकांना बसत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता गावातील हातपंपाचे खोलीकरण करण्याकरिता मशीन आली असता येथील पंचायत समितीच्या माजी सदस्याने जागा मालकीची असल्याचे सांगत परत पाठविली. यामुळे संतपालेल्या महिलांनी शुक्रवारी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पोलीस ठाणे गाठत सदर अतिक्रमण काढून नागरिकांना पाणी देण्याची मागणी केली. तालुक्यातील ग्रामपंचायत लाहोरी अंतर्गत पारोधी, धुमनखेडा येथे मागील २५-३० वर्षांपासून तीव्र पाणी टंचाई असते. पारोधी येथे २५ वर्षांपूर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बाबाराव थुटे यांच्या घरासमोर हातपंप लावण्यात आला होता. त्या हातपंपावर गावकरी पाणी भरत असे. मात्र गत २-३ वर्षांपूर्वी हातपंपात बिघाड आला आणि तो बंद झाला. दरम्यान सन २०१५-१६ मध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने गावात नवा हातपंप मंजूर झाला. यात जुन्याच हातपंपाच्या बाजूला बोर करण्याकरिता मशीन आली असता थुटे यांनी मशीन परत पाठविली. यामुळे दुसऱ्या जागेवर हातपंप लावण्यात आला. मात्र येथे पाण्याचे स्त्रोत नसल्याने फारच कमी पाणी लागले. आता हा हातपंप कोरडा पडला. या वर्षी आतापासून पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हातपंपाचे खोलीकरण करण्यासाठी मशीन बोलावली असता थुटे यांनी ती पुन्हा परत पाठविली. शिवाय येथे कसे बोर करता मी पाहतो, अशी धमकीही दिल्याचे संतप्त महिलांचे म्हणणे आहे. यामुळे लाहोरी ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता गेडाम, उपसरपंच महादेव बादले यांच्या नेतृत्वात संतप्त महिला पुरूषांनी तहसीलदार दीपक कारंडे, गटविकास अधिकारी विजय लेंढे, ठाणेदार प्रवीण मुंडे यांना मोर्चाद्वारे निवेदन देत थुटे यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी केली. मोर्च्यात लक्ष्मी अवलेनकर, विजया ढाकणे, चंद्रकला चतुर, सारिका राऊत, वंदना महाकाळकर, शालू डंभारे, मीरा झाडे, विमल दाते, शकुंतला आडकिने, माधुरी लोणले, मनीषा डंभारे, वर्षा चतुर, सुनिता तांदुळकर, मंदा जामुनकर, उषा लोणारे, सरला ठसे, कविता शिंदे, शारदा येंडे, वत्सला थुटे, चंद्रकला डंभारे, नारायण बादले, वसंता थुटे, धर्मा मेंढे यांच्यासक महिला उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)